shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सावधान !! महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदभरती...सोशल मीडियावर फिरणारी बातमी खोटी..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
मंगळवार दिनांक ०१ मार्च २०२२

सावधान! महात्मा फुले कृषी विद्यापीठात पदभरती...सोशल मीडियावर फिरणारी बातमी खोटी..!!
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठात सुपरवायझर, सुरक्षा रक्षक आणि मजूर या पदांकरिता पदभरती अशी जाहिरात व्हाट्सअप आणि इतर सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.तरी कुणीही या जाहिरातीवर विश्वास ठेवू नये.
        महात्मा फुले कृषि विद्यापीठाने अशी कोणतीही पदभरतीची जाहिरात सोशल मीडियावर अथवा प्रिंट मीडियावर प्रसिद्ध केलेली नाही. विद्यापीठामध्ये कोणत्याही पदांची भरती सुरू नाही. सोशल मीडियावर फिरणाऱ्या खोट्या जाहिरातीमध्ये फोन नंबर दिलेला असल्याने त्याला आपण संपर्क करून आपले काही कागदपत्र दिल्यास किंवा काही व्यवहार केल्यास त्यास विद्यापीठ जबाबदार राहणार नाही. कृषी विद्यापीठाचा व त्या जाहिरातीचा कोणताही संबंध नाही.  
      या प्रकारची पदभरतीची खोटी जाहिरात आपल्या व्हाट्सअप ग्रुपवर आली तर कृपया ती दुसऱ्या ग्रुपला फॉरवर्ड करू नये, असे आव्हान विद्यापीठाचे कुलसचिव श्री. प्रमोद लहाळे यांनी केले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close