शिर्डी एक्सप्रेस लाईव्ह नेटवर्क:
शिर्डी परीक्रमेचा प्रचार,प्रसार करण्यासाठी व मोठ्या संख्येने सहभाग वाढावा याकरिता शिर्डी-साकुरी शिव (पश्चिम) भागातील महिलांची विशेष बैठक पार पडली..
महिला दिनाचे औचित्य साधत परिक्रमा पत्रकाचे लोकार्पण उपस्थित महिलांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.
उद्या शिर्डी-साकुरी शिव (पश्चिम) येथील तरुणांची बैठक घेण्यात येईल.
या बैठकीत महत्वपूर्ण आणि विविध मुद्यांवर चर्चा झाली..यावेळी ग्रीन अन क्लीन शिर्डीचे अजित पारख,मणीलाल पटेल यांनी परिक्रमे विषयी सविस्तर मार्गदर्शन केले..
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राधाकिसन मामा शिंदे होते.याप्रसंगी जितेंद्र आबा शेळके,संजय शिर्डीकर,श्री दवंगे सर,विनोदजी गोंदकर,सुनील शिंदे,भाऊसाहेब शिंदे,संजय शिंदे, आदींसह साईभक्त उपस्थित होते.
प्रास्ताविक करतांना शिर्डी परिक्रमा ही व्यापक आणि अतिशय भक्तिमय वातावरणात पार पडण्यासाठी तसेच या ऐतिहासिक सोहळ्याच्या निमित्ताने आलेल्या सर्व साधू-संतांचे साईभक्तांचे,आणि सहभागी ग्रामस्थांचे स्वागत करण्यासाठी तन-मन-धनाने सहभागी होणार असल्याचे आश्वासन दिले आहे.
अनेक महिलांनी वेगवेगळ्या महत्वपूर्ण सूचना मांडल्या.
अर्चनाताई सतीश शिंदे,मनीषाताई सुपेकर यांनी मनोगत व्यक्त केले.आभार शुभांगी ताई सुपेकर यांनी मानले.यावेळी नगरसेविका आरती ताई चौगुले,अलकाताई शिंदे,ललिता मामी आसने,सुमनताई शिंदे,लताआक्का गीते,संध्याताई रुकारे,भारती ताई चौगुले,कांचन ताई बावके,ज्योतीताई दत्तात्रय शिंदे,वंदनाताई दंडवते,सुजाताताई दंडवते,उज्वलाताई दंडवते,उषाताई आसने कल्याणीताई आसने,ज्योतीताई चौगुले,नयणाताई आसने,वृषालीताई आसने, सुवर्णाताई शिंदे,शकुंतला ताई शिंदे,बनकर ताई,शकूताई गायकवाड,लताताई गीते,अनुराधाताई शिंदे,ज्योतिताई शिंदे,सुषमा ताई शिंदे,वसुंधरा ताई शिंदे,पूजाताई गायकवाड,सरला ताई गायकवाड, गायकवाड,आदींसह महिला सहभागी झाल्या होत्या..
सचिन चौगुले पा.
अध्यक्ष-शिर्डी शहर काँग्रेस कमिटी.
नगरसेवक-शिर्डी नगरपंचायत शिर्डी.

