shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

युवकांनी ज्या व्यवसायात आपल्याला आवड आहे तो व्यवसाय निवडून आपले जीवनमान उंचवावे - अमोलराजे इंगळे.

युवकांनी ज्या व्यवसायात आपल्याला आवड आहे तो व्यवसाय निवडून आपले जीवनमान उंचवावे - अमोलराजे इंगळे.

निमगाव केतकी येथे सिद्धिविनायक अमृततुल्य या नवीन शाखेचे उद्घाटन संपन्न.

इंदापूर प्रतिनिधी: दिनांक २० मार्च २०२२ रोजी म्हेत्रे शॉपिंग सेंटर नंबर गाळा नं. ३ या ठिकाणी बिजवडी येथील उच्चशिक्षित युवा उद्योजक अतुल संजय चव्हाण यांनी सिद्धिविनायक अमृततुल्य व स्नॅक्स सेंटरची उभारणी करून निमगाव केतकी व या परिसरातील येणाऱ्या जाणाऱ्या प्रवाशांसाठी अत्यंत अत्याधुनिक पद्धतीचे उत्तम दर्जाचे सेवा देण्याच्या उद्देशाने व्यवसाय निवडला आहे. त्याचे उद्घाटन युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांच्या हस्ते व ॲड. श्रीकांत करे, तुषार भोसले, ॲड. सचिन राऊत, सागर मिसाळ, ज्ञानेश्वर फलफले, अनिकेत चव्हाण, स्वप्नील चव्हाण ,अभिषेक चव्हाण, तुषार खराडे, मांतेश आवटे, रियाज शेख, शुभम सुर्वे, गणेश जाधव ,अमर चव्हाण ,तुषार चव्हाण व ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ संपन्न झाला.
यावेळी युवा उद्योजक अमोलराजे इंगळे यांनी शुभेच्छा देताना आपले मत व्यक्त केले की, बिजवडी येथील उच्चशिक्षित अतुल संजय चव्हाण हे इंजिनियर  असूनही त्यांनी सिद्धिविनायक अमृततुल्य  चहा आणि स्नॅक्स सेंटर उभारून या व्यवसायात आपले जीवन यशस्वी करण्यासाठी याची निवड केली. ही बाब इतर युवा पिढीसाठी प्रेरणादायी ठरली असून त्यांनी नोकरीपेक्षा व्यवसायास पसंती दिली याचा अभिमान वाटतो. अशा पद्धतीने युवकांनी कोणताही व्यवसाय निवडताना ज्या व्यवसायामध्ये आपल्याला आवड आहे तोच व्यवसाय दिलखुलास विचाराने निवड करून आपले जीवनमान त्या व्यवसाय वर उंचवावे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त करून चव्हाण यांना शुभेच्छा दिल्या.
close