काटी गावामध्ये "एक तास राष्ट्रवादीसाठी-आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी" हा कार्यक्रम संपन्न .
इंदापूर प्रतिनिधी:राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांच्या सुचनेनुसार आज काटी गावामध्ये एक तास राष्ट्रवादीसाठी- आगामी महाराष्ट्राच्या विकासासाठी हा उपक्रम राबवत गावातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन विविध विषयांवर विचार-विनिमय शनिवार दिनांक ५ मार्च २०२२ रोजी केला.
याप्रसंगी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते साहेबराव मोहिते,ग्रामपंचायत सदस्य हेमंत पाटील,काटी गावच्या विद्यमान सरपंच रेखाताई मरगळ,ग्रामपंचायत सदस्य सर्वस्वी दादासाहेब भोसले,विपुल वाघमोडे सर,बाळासाहेब लोखंडे सर, अमोल गोरे,राष्ट्रवादीचे युवा नेते वैभव वाघमोडे,दत्तात्रय माने,दत्तात्रय आरडे,वसंत भोसले तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या तालुकाध्यक्षा श्रीमती छायाताई पडसळकर यांच्यासह गावातील राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक ज्येष्ठ नेते तसेच युवक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
काटी गावामध्ये राष्ट्रवादी पक्ष संघटना अजून मजबूत करण्यासाठी सर्वांनी एकदिलाने काम करून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला काटी गावातून विक्रमी मताधिक्य मिळवून देण्याचा निश्चय यावेळी उपस्थित सर्वच पदाधिकाऱ्यांनी केला. एकूणच आजचा हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून यानिमित्ताने सर्वजण राष्ट्रवादी एक कुटुंब काम करत आहेत याचा निश्चितपणे आनंद राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांना असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस महिला अध्यक्ष छायाताई पडसळकर यांनी सांगितले.

