नगर :- दिपेश गोरक्ष पिटेकर हे शेवगाव अहमदनगर येथील रहिवासी आहेत, त्यांचे BSc Agriculture पर्यंतचे उच्च शिक्षण झालेले आहे व ते ग्राम विकास अधिकारी या पदावर जिल्हा परिषद अहमदनगरमध्ये नोकरीला येथे आहेत. त्यांना कविता रचना, लिखाण, गाणी, समाज प्रबोधन करणे इत्यादी विषयी अतिशय आवड आहे.
त्यांना वडार समाज भूषण पुरस्कार, उत्कृष्ट सूत्र संचालन, कला रत्न इत्यादी पुरस्कार आजपावेतो मिळाले आहेत. त्यांना बहुजन समाजाला शिक्षणासाठी प्रवृत्त करणे, मार्गदर्शन करणे हा विषय फार आवडतो.
त्याचे 'वडार गीत' हे पुस्तके प्रकाशित झाले आहे आणि अनेक वडार गीत हस्तलिखित आहेत पण प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. त्यांचे सकारात्मक विचार वृध्दींगत होवोत आणि त्यांच्या भावी वाटचालीस शिर्डी एक्सप्रेस परिवाराच्या वतीने मनस्वी हार्दिक शुभेच्छा...!

