shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विद्यार्थ्यांनी अभ्यासा सोबतच गायन ,वादन ,नृत्य ,अभिनय, अवांतर वाचन इत्यादी कला गुणांकडे ही लक्ष द्यावे - तहसीलदार श्रीकांत पाटील.

विद्यार्थ्यांनी अभ्यासा सोबतच गायन ,वादन ,नृत्य ,अभिनय, अवांतर वाचन इत्यादी कला गुणांकडे ही लक्ष द्यावे - तहसीलदार श्रीकांत पाटील.
इंदापूर प्रतिनिधी:विद्यार्थ्यांनी अभ्यासा सोबतच गायन ,वादन ,नृत्य ,अभिनय, अवांतर वाचन इत्यादी कला गुणांकडे ही लक्ष द्यावे. त्यासाठी आवश्यक  वेळ काढून आपल्या कलागुणांची जोपासना करावी असे आरोग्य संदेश बहुउद्देशीय प्रतिष्ठान आयोजित या किड्स आयडॉल स्पर्धेत इंदापूर, बारामती, दौंड , माढा ,माळशिरस ,आटपाडी तालुक्या तून ४५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. सदर विद्यार्थ्यांना बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील यांनी आपले मत व्यक्त केले.

इंदापूर येथे आरोग्य संदेश बहुउद्देशीय प्रतिष्ठान आयोजित या किड्स आयडॉल स्पर्धेत इंदापूर, बारामती, दौंड , माढा ,माळशिरस ,आटपाडी तालुक्या तून ४५० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
या विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय महापुरुष व निसर्गावर आधारित वेशभूषा साकारली होती. या स्पर्धेसाठी सुप्रिया अगरखेड,जयश्री सरके, शकीला सय्यद यांनी परीक्षणाचे काम पाहिले .एकूण ३७ विद्यार्थ्यांना बक्षीस देण्यात आली. प्रथम तीन क्रमांकांना सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्र व किड्स आयडल रिबीन देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी सिद्धिका जाधव हिने सादर केलेली वेशभूषा व संवाद फेक सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली.

यावेळी तहसीलदार श्रीकांत पाटील म्हणाले,  विद्यार्थ्यांनी अभ्यासा सोबतच गायन ,वादन ,नृत्य ,अभिनय, अवांतर वाचन इत्यादी कला गुणांकडे ही लक्ष द्यावे. त्यासाठी आवश्यक  वेळ काढून आपल्या कलागुणांची जोपासना करावी . ज्या ज्या ठिकाणी अशा स्पर्धेचे आयोजन होते, त्या सर्व स्पर्धेमध्ये सहभागी होऊन आपल्या गुणांचा विकास करावा. विद्यार्थीदशेत असताना तुमच्याकडे असणारे वेळेचा सदुपयोग करून आपला सर्वांगीण विकास कसा साधता येईल याकडे विद्यार्थ्यांनी, पालकांनी आणि विशेषत मार्गदर्शक शिक्षकांनी लक्ष द्यावे.

गटविकास अधिकारी विजयकुमार परीट म्हणाले, सर्वांमध्ये काही वैशिष्ट्यपूर्ण गुण असतात त्या गुणांची ओळख होऊन त्या प्रतिभे स खतपाणी घालण्याचे काम अशा स्पर्धांमधून होत असते. आपलीच आपल्याला एक नवीन ओळख होते.

 गट शिक्षण अधिकारी राजकुमार बामणे हे आपल्या दोन्ही मुलांसह आवर्जून उपस्थित होते. आपल्या मुलांना असे नित्य नवीन अनुभव देण्याचा मी नेहमी प्रयत्न करत असतो आपणही या छोट्या चिमुकल्यांचा सन्मान करण्यासाठी जो वेळ येथे दिला आहे त्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले.

यावेळी आरोग्य संदेश प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. संदेश शहा, कार्याध्यक्ष तुषार रंजनकर यांची भाषणे झाली. 
सेवानिवृत्तीनिमित्त विस्ताराधिकारी छाया धापटे  यांचा सन्मान प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला. उपस्थित शिक्षकांना  पुस्तके भेट देऊन त्यांचाही  सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव जमीर शेख यांनी तर सूत्रसंचालन मधुमती उदे व  आशा रणदिवे यांनी केले.
कार्यक्रम यशस्वीते साठी दीपक जगताप, सुभाष पानसरे यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी माजी नगराध्यक्ष अशोक इजगुडे, मारुती वाघमोडे, अनुराधा इनामदार, फौजिया शेख उपस्थित होते.

स्पर्धेतील विजेते पुढील प्रमाणे आहेत.
लहान गट -
स्वराजी सागर, अनुश्री वाघ, राजवीर बेरे, सानवी कान्हेरे, अनन्या चित्राव

मध्यम गट-
विराज खाडे ,अक्षरा बनकर, यशस्वी निंबाळकर, सिद्धिका जाधव, जिया जोशी.

मोठा गट-
रूही गार्डे, अंजुम शेख, अनन्या  इजगुडे, सई  भितांडे, रिया वाघमारे
close