सेनगांव तालुक्यातील घटना,स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई..!!
हिंगोली/प्रतिनीधी(विश्वनाथ देशमुख)
दि१२,हिंगोली जिल्ह्यातील सेनगांव तालुक्यातील जामदया शिवारात एका आखाड्यावर स्पिरीटपासुन देशी दारू तयार करणाऱ्या अड्डयावर दि.११ मार्च शुक्रवार रोजी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड टाकत आरोपी भगवान शेळके याच्या विरुध्द औंढा(नागनाथ) पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार सेनगांव तालुक्यातील जामदया शिवारात स्पिरीटपासुन भगवान नामदेव शेळके यांच्या आखाड्यावर स्पिरीटपासुन बनावट देशी दारू तयार केली जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.पोलीस अधिक्षक राकेश कलासागर,सहाय्यक पोलीस अधिक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय,उप निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने शुक्रवार रोजी सायंकाळी छापा टाकला मात्र पोलीस येत असल्याची कुणकुण लागताच आरोपी भगवान शेळकेने घटना स्थळावरून पळ काढला.घटनास्थळावरुन पोलीसांनी तीन टाक्या रसायन व स्पिरीट तसेच तयार केलेली बनावट देशी दारू,देशी दारुचे लेबल असलेल्या १५५ रिकाम्या बाँटल,१३००० झाकणे,देशी दारु भरलेल्या ५८ बाटल्या असा एकुण ९६ हजाराचा ऐवज पोलीसांनी जप्त करुन याप्रकरणी जमादार आडे यांच्या तक्रारीवरून औंढा(नागनाथ) पोलीस ठाण्यात भगवान नामदेव शेळके रा.जामदया ह.मु.हुडी लिंबाळा ता.सेनगांव याच्याविरुद्ध कलम ३२८,४२० सह कलम ६५(ख) (ड) म.दा.का अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास औंढा पोलीस करीत आहेत.या पथकात जमादार बालाजी बोके,भगवान आडे,संभाजी लेकुळे,राजु ठाकुर,किशोर सावंत,विठ्ठल काळे,ज्ञानेश्वर पायघन,आकाश टापरे,शेख जावेद,महिला कर्मचारी पारु कुडमेथे यांचा समावेश होता.

