प्रतिनिधी : प्रविण देशमुख
भेंडा : ३० / नेवासा तालुक्यातील भेंडा येथील गिताजंली शशिकांत सुर्यवंशी (शिंदे) च सौ. आशा गणेश शिंदे शिक्षिका अल्फा इंग्लिश मेडियम स्कुल भेंडे खुर्द हया ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या मराठी स्टेनोग्राफी (लघुलेखन) ८० व १०० शब्द प्रती मिनिट या परिक्षेत उर्तीण झालेल्या आहेत. सौ. शिंदे (सुर्यवंशी) यांना अनुक्रमे ७६ व ७९ टक्के तसेच सौ. आशा शिंदे (मॅडम) यांना प्रत्येकी ७६ टक्के मार्क्स मिळवून उर्तीर्ण झालेल्या आहेत.
कु. गितांजली चे वडील श्री. शशिकांत सुर्यवंशी हे लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा. कारखान्याचे कामगार असून धुळे येथील अॅड. स्वप्नील प्रतापराव शिंदे यांच्या सुविद्य पत्नी असून इंग्रजी स्टेनोग्राफी व १२० शब्द प्रती मिनिट परिक्षेत यापूर्वीच उर्तीण झालेल्या आहेत. त्यांचे शिक्षण बी.एस्सी (मायक्रो बॉयलॉजी) व सौ. आशा शिंदे मॅडम शिक्षण बी.ए.बी.एड. हया अभिनंदन केशकर्तनालयाचे प्रोप्रा. श्री. गणेश शिंदे यांच्या सुविद्य पत्नी आहे.
त्यांचे या यशाबद्दल लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर स.सा. कारखान्याचे चेअरमन मा.आ. नरेंद्रजी घुले पाटील, माजी चेअरमन मा.आ. चंद्रशेखर घुले पाटील, व्हा.चेअरमन मा.आ. पांडुरंग अभंग, जेष्ठ संचालक अॅड. देसाई (आबा) देशमुख, काशिनाथ नवले पाटील, काकासाहेब शिंदे, अशोकदादा मिसाळ, नागेबाबा पतसंस्थेचे संस्थापक कडूभाऊ काळे, सरपंच डॉ. शिवाजीराव शिंदे, तुकाराम मिसाळ, कार्यकारी संचालक अनिल शेवाळे, सेक्रेटरी रविंद्र मोटे, जनसंपर्क अधिकारी कल्याणराव म्हस्के, कारभारी गायके, अप्पासाहेब खरड, विलासराव लोखंडे, बाळासाहेब आरगडे, अॅड.सुनिल शिंदे, इब्राहिमभाई सय्यद तसेच सोनई येथील स्टेनोग्राफर प्रशिक्षक हापसे सर आदीनी अभिनंदन केले.
निर्मल ग्राम भेंडे सारख्या ग्रामीण भागातून स्टेनोग्राफर म्हणून परिक्षेत अल्पावधीत यश मिळाल्याबद्दल त्यांचे परिसरात कौतुक करण्यात येत आहे. या विद्यार्थीनींना मा. कार्यकारी संचालक यांचे माजी स्वीय सहाय्यक नामदेव भानुदास पुंड यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले असल्याचे सदर विद्यार्थीनींनी सांगितले.

