shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

चारशे गुरांची तपासणी व उपचारपशुवैद्यकीय शिबीर संपन्न..!


न्याहळोद :- जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभाग तर्फे  जिल्ह्यात पशुचिकित्सा शिबिरे आयोजित केली आहेत . न्याहळोद येथे कृषी सभापती संग्राम पाटील  यांच्या मार्गदर्शनाखाली पशुसंवर्धन विभागाने गुरांवर विविध तपासण्या व उपचार करण्यात आले . 

पशुवैद्यकीय दवाखान्यात घेण्यात आलेल्या शिबिरात जंतुनाशक पाजणे , गोचीड निर्मूलन , लसीकरण , वळू बोकडचे खच्चीकरण तसेच गर्भतपासण्या करण्यात आल्या. कार्यक्रमास कृषीसभापती संग्राम पाटील , जिल्हा परिषद संवर्धन अधिकारी राजेंद्र लंघे , पशुवैद्यकीय अधिकारी प्रशांत निकम , संदीप निकम , संदीप देवरे , निलेश ठाकूर , जगदीश बागुल , न्याहळोद पशुवैद्यकीय दवाखाण्याचे पशुवैद्यक  नरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

उपस्थित पशुपालकांनी समस्या विचारल्या . यावेळी गटनेते विकास पवार , पंचायत समिती सदस्य योगराज पवार आदी उपस्थित होते . 
 येथील पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी क्रमांक दोन आहे . येथील कर्मचाऱ्यांना इतर काही गावांना देखील भेट देऊन पशूउपचार करावे लागतात , यावेळी स्थानिक पशुमालकांना आपल्या गुरांवर उपचार विना परत जावे लागते . रिक्त पदे भरल्यास ही समस्या दूर  होईल अशी मागणी केली .

(  पशुसंवर्धन विभागात अनेक रिक्त पदे भरणे बाबत मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी मंत्रालयात मागणी केली आहे . या बाबतीत पुढील आठवड्यात मंत्रालयात जाऊन पाठपुराव्याने वैद्यकीय अधिकारी निवड करण्यात येईल . )  ---  संग्राम पाटील , कृषी पशुसंवर्धन सभापती जि प धुळे .
close