वडापूरी येथील प्रगतशील बागातदार भागवत काटकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश.
भागवत काटकर यांच्या प्रवेशाने वडापुरीच्या विकास कामांना गती मिळणार.
इंदापूर प्रतिनिधी: वडापुरी गावातील प्रगतशील बागायतदार तसेच ज्यांच्या घरांमध्ये उपसरपंच पद होते असे आसणारे
भागवत काटकर यांचा पुणे येथे पुणे जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँक येथील कार्यालयात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
यावेळी वडापुरी गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हनुमंत जगताप तोबरे वडापुरी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष शिवाजी तरंगे युवा नेते दादासो जगताप, श्रीनाथ पाणी पुरवठा संस्थेचे उपाध्यक्ष हरिदास माने, महेंद्र काळे, चिंटू काटकर महेश काटकर.महेंद्र काटकर, प्रमोद काटकर, मंगेश माने, सचिन पवार, अविनाश पवार, सोनू धोत्रे, भय्या जगदाळे, मुकेश जगदाळे, अनिल पवार, संदीप शिर्के, प्रदीप मदने, विजय काळे, अर्जुन बागल इत्यादी उपस्थित होते.
भागवत काटकर हे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे समर्थक होते त्यांनी दिनांक २५ एप्रिल रोजी पाटील यांची साथ सोडत राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला.
यावेळी भागवत काटकर यांनी काटकर वस्ती कडे जाणारे रस्ते तसेच इतर कामे करावीत अशी मागणी केली असता राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यावेळी सांगितले की वडापुरी गावातील सर्व विकासकामे लवकरच केली जाणार असून वडापुरी गावातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते लहान-मोठे यांना विश्वासात घेऊन एक दिलाने वडापुरी गावातील विकास कामे करावी त्यासाठी लागणारा निधी इतर माध्यमातून पुरवण्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करेल तसेच गावांमध्ये ज्येष्ठांना सोबत घेऊन विकास कामे करावे
भागवत काटकर हे कार्यक्षम कार्यकर्ता असून त्यांचा वडापुरी येथील राजकीय व सामाजिक कार्याचा विचार करता वडापुरी गावासाठी व राष्ट्रवादी काँग्रेस साठी त्यांचा निश्चित फायदा होईल व वडापुरी च्या विकास कार्यांमध्ये गती मिळेल या वेळी त्यांनी भागवत काटकर यांचे अभिनंदन केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते दादासो जगताप यांनी दिली.

