प्रतिनिधी : शिवहरी म्हस्के
साकत : १४ / नगर तालुक्यातील साकत खुर्द ग्रामपंचायत येथे भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंती निमित्ताने कार्यालयात साकत ग्रामस्थांच्या वतीने डॉ. बाबासाहेब यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्व मान्यवरांकडून अभिवादन करण्यात आले.
या वेळी साकतचे उपसंरपच बाबासाहेब चितळकर यांनी आपल्या भाषणात बोलत असताना डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी जे कार्य केले आहे ते चिरकाल दूरदृष्टी ठेवून सर्व समावेशक घटकांचा विचार करून घटना मसुद्यात अनेक महत्त्वाच्या घटनांचा समावेश केला.
जसे आपल्या कडे दोन नाणे आहे.त्यातील एक नाणे भाकर खायला ठेवा एक पुस्तक खरेदी करायला ठेवा. भाकर जगवेल आणि पुस्तक शिकवेल हे धोरण बाबासाहेब यांनी अंगीकारले . त्या काळात त्यांनी उच्च शिक्षण घेऊन देशहितासाठी उपयोगी आणले तसेच इतरांनीहीआणावे अशा समर्पित वृत्तीने देश हितासाठी शिक्षण उपयोग आणले तर भारत देश महासत्ता झाल्याशिवाय राहणार नाही. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे असे त्यांनी सांगितले .
या वेळी साकत खुर्दचे सरपंच जाईबाई केदार, उपसरपंच बाबासाहेब चितळकर, बापुसाहेब केदारे, तात्यासाहेब वाघमोडे,अशोक गायकवाड, बाबासाहेब भोसले, अर्जुन भोसले, महादेव धनगर, राजु वाघमोडे, सिध्दु केदारे, राणु हाटकर, आदी मान्यवर उपस्थित होते .

