कौठळी शाळेत इयत्ता ४ थी मधील विद्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा उत्साहात पार.
इयत्ता ४ थी मधील सर्व विद्यार्थ्यांना गोष्टींची पुस्तके भेट
उन्हाळी सुट्टीत अभ्यासाबरोबर विविध छंद जोपासा - नंदकुमार सूर्यवंशी .
इंदापूर प्रतिनिधी:आज दिनांक २७/४/२०२२ रोजी जि प प्राथ शाळा कौठळी येथील इयत्ता ४ थी मधील विध्यार्थ्यांचा शुभचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.उपक्रमशील शिक्षिका आरती गायकवाड यांनी शिक्षक व विद्यार्थी नाते यावर मुलांना मार्गदर्शन केले.नंतर भारत ननवरे सरांनी मुलांना पूर्व इतिहास सांगून सर्व आठवणी जाग्या केल्या. सरांचे भाषण ऐकताना मुलांच्या व शिक्षकांच्या डोळ्यात पाणी आले. सरांनी मुलांना एक सल्ला दिला काही झाले तरी स्वतःचे,आपल्या शाळेचे व गावाचे नाव सतत उंचवत ठेवायचे.त्याचबरोबर सरांनी मुलांना प्रश्न विचारला तुम्ही सुट्टीत काय काय करणार? यावर विद्यार्थ्यांनी सांगितले की मी वाचन करणार,पोहायला शिकवणार,गाणी-गोष्टी ऐकणार, गोष्टींची पुस्तके वाचणार,खेळ खेळणार, गणिते सोडवणार,पाढे पाठांतर करणार,आईला कामात मदत करणार,गावाला जाणार,फिरायला जाणार इ.नंतर मुख्याध्यापक नंदकुमार सूर्यवंशी यांनी मुलांना गोष्टींची पुस्तके भेट देऊन शुभेच्छा दिल्या.
सर्व मुलांना शाळेच्या वतीने गोड जेवण देण्यात आले.पहिली पासून आपल्या समोर असणाऱ्या,खेळणाऱ्या, अभ्यास करणाऱ्या,कला सादर करणाऱ्या मुलांना निरोप देणे मात्र खूप अवघड जात होते.शेवटी सर्व मुलांना शुभेच्छा देऊन उज्ज्वल भविष्य घडवण्यासाठी कानमंत्र देण्यात आला.

