पद्मविभूषण खा. शरद पवार यांच्या हस्ते जय भवानीगड विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलचे रविवारी उद्घाटन तसेच भव्य शेतकरी मेळावाचे आयोजन - श्रीमंत ढोले.
जय भवानीगड विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुल लाखेवाडी येथे भव्य दिव्य अशा कार्यक्रमाची जय्यत तयारी.
इंदापूर प्रतिनिधी:रविवार दिनांक ३ एप्रिल २०२२ रोजी सकाळी १० वाजता जय भवानीगड विद्या प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन स्कूल अँड ज्युनियर कॉलेज रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूलचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला असून पद्मविभूषण खासदार शरदचंद्रजी पवार माजी कृषी मंत्री भारत सरकार यांच्या शुभहस्ते तसेच महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्या विशेष उपस्थितीत व या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, खासदार संसदरत्न सौ. सुप्रियाताई सुळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, राज्य महिला आयोग अध्यक्ष रूपालीताई चाकणकर, शिरूरचे आ. अशोक पवार, मावळचे आ. सुनिल शेळके, मोहोळचे आ. यशवंत माने, पुणे जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे, पुणे जि. परिषद अध्यक्ष सौ. निर्मलाताई पानसरे, उपाध्यक्ष रंजीत शिवतारे या प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शैक्षणिक संकुलाचे उद्घाटन होणार असल्याचे माहिती जय भवानीगड विद्या प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रीमंत ढोले यांनी दिली.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आयोजित भव्य शेतकरी मेळावा व जय भवानीगड संस्थेचे अध्यक्ष श्रीमंत ढोले सर यांचा जाहीर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश होणार आहे. या कार्यक्रमासाठी भव्य दिव्य असे सुपर स्ट्रक्चरचा एक व इतर दोन भव्य दिव्य मंडप उभारण्यात आला असून यामध्ये वीस हजार लोक बसतील अशी व्यवस्था या ठिकाणी करण्यात आली असल्याचे दिसते आहे. यावरून या ठिकाणचा हा कार्यक्रम भव्यदिव्य होईल असे दिसत आहे.
लाखेवाडी येथे जय भवानीगड विद्या प्रतिष्ठान या शैक्षणिक संकुलाच्या माध्यमातून लाखेवाडी परिसरातील तसेच इतर भागातील विद्यार्थ्यांसाठी अद्यावत असे शैक्षणिक संकुलाची उभारणी झाली असून या ठिकाणी मेडिकल क्षेत्रातील डी फार्मसी कॉलेज या ठिकाणी झालेले आहे. या कॉलेजच्या विद्यार्थ्यांसाठी वस्तीगृहाची सोय करण्यात आली आहे. शैक्षणिक संकुलाचा प्रवास पाहता व उद्घाटनासाठी राष्ट्रीय नेते शरद पवार हे येणार असून या शैक्षणिक संकुलात भर म्हणून या ठिकाणी मेडिकल कॉलेज, लॉ कॉलेज होतील अशी चर्चा आहे.

