शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. गुरूवार दिनांक १४ एप्रिल २०२२
रामदास आठवलेंना पुन्हा आठवली शिर्डी; लोकसभा लढवणार असल्याची चर्चा..!!
अहमदनगर : शिर्डी लोकसभा मतदारसंघात 2009 झालेला पराभव केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना अजूनही विसरता आला नाही. त्यावेळी ते कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार होते. आता पुन्हा एकदा आठवले यांना शिर्डी लोकसभा मतदारसंघ साद घालत आहे.
गेल्या 40 दिवसांत त्यांच्या तब्बल चार वार्या या मतदारसंघात झाल्या आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. शिवसेना भाजप युती तुटल्याने शिवसेनेचे खासदार असलेल्या शिर्डीत भाजप उमेदवार देणार हे जवळपास निश्चित आहे. अशात आठवले यांनी विखे पाटील यांच्या माध्यमातून या मतदारसंघात चाचपणी सुरू केली आहे.
सन 2009 च्या निवडणुकीत काँग्रेसमध्ये असलेले आ.राधाकृष्ण विखे पाटील भाजपवासी झाले. एवढेच नव्हे तर कमळाच्या चिन्हावर राधाकृष्ण विखे आमदार तर डॉ. सुजय विखे दक्षिण नगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार झाले.त्यामुळेच बदललेल्या समीकरणांचा लाभ उठवत शिर्डीतुन दिल्ली गाठण्यासाठी आठवले प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

