shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

गुंडेगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये विविध उपक्रम साजरे करून नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत..!

राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. १२-४-२०२२

      नगर तालुक्यातील गुंडेगाव येथील कासारमळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शैक्षणिक गुढी उभारुन जूनमध्ये शाळेत दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले .यावेळी शाळेमध्ये विविध खेळातून गाण्यांमधून कथा वाचनातून  विद्यार्थ्यांना शाळेबद्दल आवड निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, यामुळे विद्यार्थी पटामध्ये वाढ होत आहे. या शाळेच्या प्रगतीमुळे कासारमळा परिसरातील पालकांची आपल्या पाल्यांचा इतर माध्यमांच्या खासगी शाळेत प्रवेश घेण्यापेक्षा मातृभाषेतून शिक्षण घेणाऱ्या जिल्हा परिषद शाळेची निवड केली आहे.
 जिल्हा परिषद संकल्पनेतून गुढीपाडवा प्रवेश वाढवा या विशेष उपक्रमाची सुरुवात केली आहे.यामध्ये गुढी ज्ञानाची, गुडी शिक्षणाची,गुढी पटाची हे वाक्य घेऊन काम केले जात आहे, यावेळी शाळेच्या परिसरात मुलांनी विविध प्रकारच्या फळे, भाजीपाला,खेळणी यांची दुकाने मांडून व्यवहार ज्ञानाचे धडे घेत खरेदीचा आनंद घेतला,
 तसेच शाळेच्या शिक्षिका शुभांगी मोरे, उषा कदरे यांनी सांगितले की नवीन पालकांना शाळेत आणून शाळेत शिकवल्या जाणाऱ्या विविध उपक्रमाची माहिती दिली जात आहे,तसेच विविध शैक्षणिक साहित्याचा वापर वाढल्यामुळे विद्यार्थ्यांची प्रगती होत असल्याचे पालकांना समजून सांगत आहोत त्यामुळे नवीन शैक्षणिक वर्षात पट आणखी वाढेल असा आम्हाला विश्वास आहे या कार्यक्रमासाठी शिक्षिका शुभांगी मोरे,उषा कदरे, प्रमिला भापकर यांनी परिश्रम घेतले.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष भाऊसाहेब कोतकर, उपाध्यक्ष विठ्ठल कासार,त्रिदल सैनिक संघटनेचे अध्यक्ष श्यामराव कासार, नानासाहेब कासार, परिगा कासार,वर्षा कोतकर,जया भापकर, प्रगती भापकर, प्रमिला भापकर,रवी भापकर, विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच पालक उपस्थित होते.
close