सामाजिक कार्यकर्ते दिपक घोडेकर यांचे निधन
प्रतिनिधी : संजय वायकर
नगर :१६ / सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे दिपक घोडेकर (वय ४० ) रा . नालेगाव , अहमदनगर यांचे आज दि.१६ एप्रिल २०२२ रोजी हृदयविकारच्या झटक्याने दुःखद निधन झाले .त्यांचा अंत्यविधी दुपारी १.०० वाजता नालेगाव अमरधाम येथे झाला .
त्यांच्या मागे आई, पत्नी,एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे . ते अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे होते .
ते संग्राम भैय्या फाऊंडेशनचे अध्यक्ष होते .त्यांच्या निधनाने नगर शहर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे .
शिर्डी एक्सप्रेस टीम कडून भावपूर्ण श्रध्दांजली .

