श्रीरामपूर (शौकतभाई शेख): - माजी सैनिक राम ज्ञानदेव म्हैस यांची वडिलोपार्जित एक एकर शेती असून त्या शेतीमध्ये शेतीचे वाटप होऊन रितसर चार वाटे (हिस्से) झालेले आहेत त्यामधून एक एकरचा हिस्सा माजी सैनिकाच्या वाटणीला आला आहे, झालेल्या वाटणीमध्ये एक सामाईक विहीर असून या विहिरीवर सध्या ३ एचपी ची मोटर बसवलेली आहे.
सदरील या मोटरचे कनेक्शन अजोबा पूंजा म्हैस यांच्या नावे २० वर्षापूर्वी घेतले आहे,परंतु आजोबा २० वर्षापूर्वी मयत झालेले असून आजपर्यंत त्यांच्याच नावे राजरोसपणे हे कनेक्शन सुरू आहे,सध्या गेल्या दोन वर्षापासून माजी सैनिकाचे असलेल्या एक एकर क्षेत्रामध्ये मधुकर चंद्रभान म्हैस,सोमनाथ म्हैस,नामदेव म्हैस शरद म्हैस,इंद्रभान म्हैस,योगेश म्हैस,गणेश म्हैस हे सर्वजण माजी सैनिक राम ज्ञानदेव म्हैस यांना शेतीसाठी पाणी देण्यास मज्जाव करीत आहे.
त्यामुळे दोन वर्षापासून हे एक एकर क्षेत्र पडीक पडून आहे,त्यामुळे माजी सैनिकाला आर्थिक नुकसाणीला सामोरे जावे लागत आहे, पाण्यासाठी माजी सैनिकाने पर्याय म्हणून आपसात बसून पाहुणे मंडळीमार्फत,मित्र मंडळीं मार्फत,गाव पातळीवर तंटामुक्तीच्या माध्यमातून देखील हा न्यायनिवाडा करण्याचा अनेक वेळा प्रयत्न केला आहे,तंटामुक्ती कमिटीने या विषयावर योग्य तोडगा काढून आदेश दिला असता संबंधितांनी या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
त्याच प्रकारे महावितरण कंपनी कडे २० वर्षापासून मयत असलेल्या व्यक्तीच्या नावे जे ३ एचपी चे कनेक्शन आहे ते रद्द करण्यासाठी व चौघांच्या नावे तीन एचपी चे कनेक्शन देण्यास अर्ज केला असता तो अर्ज महावितरणणे अमान्य केलेला आहे,मात्र २० वर्षांपूर्वी जी व्यक्ती मयत झालेली आहे आणी त्या व्यक्तीच्या नावे अजूनही राजरोसपणे वीज कनेक्शन चालू आहे.
भविष्यात या विहिरीवर वीजेमुळे काही अनर्थ घडल्यास त्याची जबाबदारी नेमकी कोणाची असेल ?, त्याचप्रमाणे मोटर देखील सामुहिक असल्यामुळे बिघाड झाल्यास मोटर वरती काढण्यासाठी, दुरुस्ती खर्च, वीज बिल भरण्यास कायमस्वरूपी टाळाटाळ केली जाते,यामुळे शेतीच्या उत्पन्नातील मोठे नुकसान सहन करावा लागत आहे,तसेच या सर्व गोष्टींचा वरील व्यक्तींच्या मनात राग धरून, आमची मुले व पुतणे यांना शाळेत जात असताना रस्त्यात आडवणे, शिवीगाळ करणे,घाणेरडे शब्द वापरणेअशा पद्धतीचा त्रास या वरील व्यक्तींच्या माध्यमातून सतत होत आहे.
यासाठी माजी सैनिकास न्याय मिळावा म्हणून मा.तहसीलदार श्रीरामपूर यांच्याकडे त्रिदल सैनिक संघटनेच्या माध्यमातून निवेदन सादर केले आहे. निवेदनावर त्रिदल सैनिक संघटनेचे (अहमदनगर उत्तरचे) उपाध्यक्ष मेजर कृष्णा सरदार,तालुका उपाध्यक्ष संग्राम यादव, महिला अध्यक्ष छायाताई मोटे, विलास खर्डे, सुनील गवळी, रवींद्र देशमुख, भगीरथ पवार, नारायण राऊत, गुलाब सय्यद यांच्या सह्या आहेत

