shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

मा. खा. प्रसाद तनपुरे यांच्या शुभहस्ते खडांबे खुर्द येथे सुमारे ५ कोटी ३५ लाख रुपये खर्चाचे विद्युत सब स्टेशन उभारणीचा भूमिपूजन समारंभ संपन्न..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                                  शनिवार दिनांक १६ एप्रिल २०२२


मा. खा. प्रसाद तनपुरे यांच्या शुभहस्ते खडांबे खुर्द येथे सुमारे ५ कोटी ३५ लाख रुपये खर्चाचे विद्युत सब स्टेशन उभारणीचा भूमिपूजन समारंभ संपन्न..!!

राहुरी (खडांबे खुर्द) :   वीजनिर्मितीसाठी केंद्र शासनाकडून अडवणुकीचे धोरण घेतले जात असून वीज वितरण कंपनीचा खाजगीकरण करण्याचा डाव असल्याचा आरोप माजी खासदार प्रसाद तनपुरे यांनी केला राहुरी तालुक्यातील खडांबे खुर्द येथे सुमारे ५  कोटी ३५ लाख रुपये खर्चाचे विद्युत सब स्टेशन उभारणीचा भूमिपूजन प्रसंगी ते बोलत होते.

      अध्यक्षस्थानी बाळासाहेब जठार होते. सरपंच कानिफनाथ कल्हापुरे, माजी सरपंच शामराव खेस्माळसकर, भागवतराव पागिरे, दिलीप जठार ,किसन जवरे उपअभियंता धीरज गायकवाड ,कानिफनाथ कल्हापुरे, आणासाहेब शेळके, प्रभाकर हरिश्चंद्रे, विलास कल्हापूरे, किशोर हरिश्चंद्रे,भरत पवार, अंशबापू आवारे, आणि मयूर शेळके तसेच  पंचक्रोशीतील  नागरिक उपस्थित होते.
      खा. तनपुरे म्हणाले की खडांबे गावाने दोन एकर जागा उपलब्ध करून दिल्याने सब स्टेशन उभारणीचा मार्ग मोकळा झाला विजेची मागणी व तुटवडा होत असल्याने नवीन वीजनिर्मिती शिवाय पर्याय राहिला नाही प्रत्येक घटकासाठी वीज लागते या सब स्टेशन उभारणीमुळे धामोरी खुर्द, धामोरी बुद्रुक, खडांबे खुर्द व खडांबे बुद्रुक या ४ गावांचा विजेचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे. 
सदरील सब स्टेशन व्हावे म्हणून राष्ट्रवादीचे  आमचे कार्यकर्ते धोंडीराम  सोनवणे अत्यंत आग्रही होते दुर्दैवाने त्यांचे निधन झाले गेल्या १५ वर्षात महावितरण कंपनीने साधी १ रोहित्रे बसवले नाही राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पुढाकार घेत तालुक्यात ६ नवीन सबस्टेशन उभारणीचे काम हाती घेतले सुमारे ५० कोटी रुपये खर्चाची कामे सुरू केली. लवकरच विजेचा प्रश्न निकाली निघणार आहे.
राज्यावर विजेचे संकट कोसळले असून केंद्र सरकारच्या अडवणुकीचे धोरण कारणीभूत ठरत आहे. शेतकऱ्यांसाठी वीज बील सवलत योजना असल्याने त्याचा जास्तीत जास्त लाभ शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे विज बिलात जमा होणारी काही रक्कम तेथेच खर्च होणार असल्याने असा दुहेरी फायदा होत आहे विजेची गळती कमी करून जाळे विस्तारून पूर्ण दाबाने वीज उपलब्ध करून देण्यासाठी महावितरण कंपनी कसोशीने प्रयत्न करत आहे आगामी  पंधरा ते वीस वर्षात कोळशाचा साठा संपणार आहे त्यासाठी सौर ऊर्जेशिवाय पर्याय राहणार नाही. सौर ऊर्जेसाठी ही अनुदान योजना असून शेतकऱ्यांनी सौर ऊर्जेचा पंप बसविल्यास अधिक सुलभता येईल वीज वितरण कंपनीचे खाजगीकरण झाले तर शेतकऱ्यांची व नागरिकांचीही मोठी अडचण निर्माण होणार आहे. त्यासाठी वीज वितरण कंपनीला जपले पाहिजे.


      भारतीय जनता पक्ष केंद्रात सत्तेत आहे. पेट्रोल,डिझेल, गॅस,खते, कीटकनाशक,औषधे यांची महागाई वाढलेली आहे त्याविरुद्ध आंदोलन करण्याऐवजी भारतीय जनता पक्ष वीज टंचाईच्या विरोधात आंदोलन करत आहे हे हास्यास्पद असून जनतेने त्यांची दखल घेतलेली आहे वीज वितरण कंपनी सध्या 71 हजार कोटी रुपयांच्या तोट्यात आहे. असे असतानाही वितरण कंपनी शेतकरी व सर्वसामान्यांसाठी कार्यरत आहे.
कंपनीने वीजग्राहकांना विशेषता शेतकऱ्यांना वीज बिलाची देयके वेळेत देण्याची सूचना देखील केली. 

     यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे ,बाळासाहेब जठार यांची भाषणे झाली. वांबोरी उपकेंद्राच्या कक्ष अभियंता तानाजी  भोर यांनी  माहिती सादर केली. या सब स्टेशन उभारणीमुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600
close