shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त सामाजिक कार्यक्रमाचे ग्रीन फाऊंडेशन चे आयोजन

पुणे-  भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त लोणी काळभोर तिर्थक्षेत्र रामदरा कोळपे वस्ती येथील ऑक्सिजन पॉईट क्र ३ येथे भव्य दिव्य कार्यक्रम आयोजन करण्यात आले आहे . १४ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ९ :३० वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येणार आहे ,  कोळपे वस्ती येथील पहिली ते दहावीपर्यंत च्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात येणार आहे,तसेच  ग्रीन फाउंडेशन ऑक्सिजन पॉईट क्र ३ या ठिकाणी १३१ वृक्ष लावण्यात येणार आहेत,  तसेच वृक्षारोपण करून संवर्धन करणे गरजेचे आहे.

 या अनुषंगानेच ठिंबक सिंचन करण्यात येणार आहे, तसेच लोणी काळभोर येथील बौध्द वस्ती येथील ग्रंथालयास पुस्तके भेट देण्यात येणार आहेत, तसेच सायंकाळी ४  वाजता भोजन समारंभ ठेवण्यात आला आहे .अशा पद्धतीने ग्रीन फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने जयंतीनिमित्त नियोजन करण्यात आले आहे .
close