भारतीयांना दिले विविध सामाजिक संदेश
प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : १४/ अहिंसा परमो धर्म हे जीवनातील ब्रीद वाक्य असणाऱ्या जैन बांधवांसाठी अतिप्रिय असणारी महावीर जयंती आज १४ एप्रिल रोजी नगर शहरात ठिकठिकाणी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली . महावीर भगवान यांची मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली . यावेळी जैन बांधव व भगिनी यांनी विविध कार्यक्रमात मोठ्या उत्साहाने भाग घेतला .
नगर शहरातील लक्ष्मी कारंजा येथील वर्धमान युवा परिवाराच्या वतीने महावीर जयंती निमित्त सामाजिक कार्य तसेच विविध उपक्रम सादर करण्यात आले .
रांगोळीच्या माध्यमातून रक्तदान सर्वश्रेष्ठ दान , निसर्ग वाचवा , लेक वाचवा , तसेच आत्मनिर्भर भारत असे विविध सामाजिक संदेश वर्धमान युवा परिवारामार्फत देण्यात आले . महावीर जयंतीच्या निमित्ताने वर्धमान युवा परिवार आयोजित भक्ती संध्या कार्यक्रम शिल्पा गार्डन येथील मंदिरात यशस्वीरित्या पार पडला.
यावेळी तेजस संचेती, गौरव लोढा, सिद्धांत बोरा तसेच सर्व जैन माता भगिनी आणि जैन परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते .

