shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

अवॉर्ड कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण


वारसा हक्काने नोकरी मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

प्रतिनिधी : आसावरी वायकर

नगर :२५ / वारसा हक्काने सर्वच अवॉर्ड कर्मचाऱ्यांना नोकरीत सामावून घेण्यासाठी श्रीरामपूर नगरपालिकेच्या ३५ अवॉर्ड कर्मचाऱ्यांनी अहमदनगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज दि. २५ एप्रिल पासून आमरण उपोषणास सुरुवात केली असुन यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे .

यावेळी गणेश बागडे व राकेश बागडे यांनी सांगितले की , मागील ३४ वर्षांपासून अवॉर्ड कर्मचारी न्यायापासून वंचित आहे . एकूण २०२ कर्मचाऱ्यांपैकी फक्त ९६ जणांना नोकरीत सामावुन घेतले आहे . मग इतरांना का घेतले जात नाही . त्यामुळे न्याय मिळण्यासाठी आमरण उपोषण सुरु केल्याचे त्यांनी सांगितले . मागण्या मान्य होईपर्यंत उपोषणास बसणार असल्याचे सर्व उपोषण कर्त्यांनी सांगितले .

या अवॉर्ड कर्मचाऱ्यांच्या काही मागण्या आहेत त्या पुढील प्रमाणे -
१) कायदेशीर सल्लागार मा. अॅड. व्हि. एस. बेंद्रे यांच्या पत्रानुसार तारा रमेश बागडे यांच्या वारसाला सेवेत रुजू करून घेता येत नाही. कारण सदर प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. यांची ही कायदेशीर बाब बाकीच्या २०२ अवॉर्ड कर्मचायांना लागू पडते. त्या कायदेशीर बाबीच्या विरोधात जावून नगरपालीकेने १९९६ साली रिक्त पदावर ९६ लोक सेवेत घेवून पैकी १८ अवॉर्ड कर्मचाऱ्यांच्या वारसांना सेवेत रुजू करून घेतले आहे. मग १८ लोक अॅड. व्हि. एस. केंद्रे यांच्या कायदेशीर सल्याच्या विरोधात नाही का?
२) प्रकरण न्यायप्रविष्ठ असतांना नगरपालीकेला रिक्त जागा भरुन चतुर्थ श्रेणीच्या वारसांना घेता येते का? ३) जर चतुर्थ श्रेणीच्या त्या १८ लोकांच्या वारसांना प्रकरण न्यायप्रविष्ट सेवेत रुजू करून घेता येते तर आम्हाला का नाही? (४) ९६ रिक्त जागा भरताना आमचा विचार का करण्यात आला नाही ?
१५) आम्हाला वारस हक्क देताना कायदेशीर बाबींचा विचार केला जातो मग हे चतुर्थ श्रेणीचे १८ लोक सेवेत रुजू करून घेतांना कायदेशीर बाबींचा विचार का करण्यात आला नाही? त्यावेळी नगरपालीकेच्या कायदेशीर सल्लागारांच्या ही बाब का लक्षात आली नाही?
६) सन १९९६ ला ९६ रिक्त पद सामावून घेतलेले होते. उर्वरित १०६ अवॉर्ड च्या जागा रिक्त पदावर बसवण्याचा प्रयत्न का करण्यात आला नाही ?
७) ज्या प्रकारे चतुर्थ श्रेणीच्या १८ लोकांना वारस हक्क देण्यात आला त्याच कायदेशीर बाबी विचारात घेवून आम्हाला वारस हक्क का दिला नाही? जाणून बुजून आमच्यावर अन्याय केला आहे.
८) मा. अॅड. व्हि. एस. बेंद्रे यांच्या सल्ल्यानुसार श्रीमती बागडे यांच्या वारसाला सेवेत रुजू करून घेता येत नाही व अनेक " गुंतागुंत निर्माण होईल व तथापी आपण आपल्या स्तरावरून योग्य तो निर्णय घ्यावा असे नगरपालीकेला सुचवले आहे .

यावेळी नितीन जाधव , राजु जाधव, पुष्पा बोरकर , दीपा चव्हाण, भारती नरसाळे , वंदना साठे , नंदा गायकवाड , चंदा रूपोते , संगिता कोल्हे, शकुंतला पवार, सिता तेलोरे , सुरेखा बोकफोडे , विठाबाई अढागळे, शोभा शिंदे आदि उपोषणकर्ते उपस्थित होते .
close