shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

खडांबे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्याचे दिमाखात आयोजन..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. 
 मंगळवार दिनांक १२ एप्रिल २०२२   

खडांबे खुर्द येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शाळापूर्व तयारी मेळाव्याचे दिमाखात आयोजन..!!

राहुरी (खडांबे खुर्द) : शुक्रवार दिनांक ०८ एप्रिल रोजी जि.प.शाळा-खडांबे खुर्द ता.राहुरी जि.अ. नगर येथे शाळापूर्व तयारी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.

       जून २०२२ रोजी इयत्ता पहिली मध्ये प्रवेशपाञ विद्यार्थ्यांसाठी शाळापूर्व तयारी अभियान राबवण्यात आला.यासाठी शाळेत दोन मेळावे आयोजित करावयाचे आहेत.त्यातील पहिला मेळावा शुक्रवारी शाळेत अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
      प्रथमतः जनजागृती फेरी काढून घोषणांच्या गजरात, बॅनर, घोषफलक घेऊन पालकांचे प्रबोधन करण्यात आले. त्यानंतर शाळेच्या प्रवेशव्दारात मुलांचे औक्षण करून , शाळेतील पहिले पाऊल उमटवले . मुलांना व पाहुण्यांना आकर्षक टोप्या, फुगे व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले .
 पालक व विद्यार्थ्यानी स्टॉलचा मनसोक्त आनंद घेतला तसेच  यावेळी मुलांसाठी सेल्फीपाईंट आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला

        यावेळी बोलताना तालुका शा.पो.आ.अधीक्षक श्री साळुंके साहेबांनी शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले. तर गावातील आदर्श कन्या नम्रता संजय हरिश्चंद्रे यांनी आपल्या आजी मथुराबाई रामदास हरिश्चंद्रे यांच्या स्मरणार्थ 5000 रू रोख स्वरूपात देणगी दिली. त्याचबरोबर श्री महेश कल्हापुरे यांनी सर्व मुलांना खाऊ दिला या दोन्ही दात्यांचे विदयार्थी आणि शाळा व्यवस्थापन समिती कडून अगदी मनापासून आभार व्यक्त केले.

              🍃🍂🍃🍂🍃🍂🍃🍂🍃
              🌷 शाळापूर्व तयारी मेळावा🌷
               〰️➖〰️➖〰️➖〰️➖〰️


      या सदर कार्यक्रम प्रसंगी सरपंच कानिफनाथ कल्हापुरे , मा. उपसरपंच तथा अध्यक्ष शा.व्य.स. प्रभाकर हरिश्चंद्रे, साखर काखान्याचे माजी संचालक संजय हरिश्चंद्रे, माजी उपसरपंच भैय्या पारे, ग्रा. सदस्य. जॉनी पवार, भरत पवार, अमोल हरिश्चंद्रे, विठ्ठल हरिश्चंद्रे , किशोर नन्नवरे गणेश कल्हापुरे ,संभाजी कल्हापुरे , शिवाजी रसाळ, रवी रसाळ, अशोक खोमणे, लक्ष्मण रसाळ उदय खळेकर, नाना दुधाडे, जयश्री कल्हापुरे , उर्मिला दुबे , उज्ज्वला कल्हापुरे, आरती काळे ,मीरा भुजाडी, कल्पना नन्नवरे , भाग्यश्री पवार,स्वाती कल्हापुरे , सुवर्णा खळेकर , व बहुसंख्य पालक ,ग्रामस्थ उपस्थित होते . सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका, मदतनीस, शिक्षिका मनीषा विप्रदास, मनीषा कोष्टी ,मंदा फलके यांनी अथक प्रयत्न केले.

   कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक श्री रावसाहेब जाधव यांनी केले तर आभार श्री मारुती कुलट यांनी मानले.

 Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600


close