shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

थोर महापुरुषांच्या जयंती महोत्सव साजरा करताना तरुणाईने "वाद्याचा गजर करण्या ऐवजी ज्ञानाचा जागर करावा" - डॉ. प्रकाश पांढरमिसे

थोर महापुरुषांच्या जयंती महोत्सव साजरा करताना तरुणाईने "वाद्याचा गजर करण्या ऐवजी ज्ञानाचा जागर करावा" - डॉ. प्रकाश पांढरमिसे
इंदापूर प्रतिनिधी:बावडा येथील श्री शिवाजी एज्यूकेशन सोसायटीचे श्रीमती रत्नप्रभादेवी पाटील महाविद्यालयात इतिहास विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 131 व्या जयंतीचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला  मोठया संख्येने विध्यर्थी उपस्थित होते. या कार्यक्रमाला ‌ प्रमुख पाहुणे म्हणून इतिहास विभाग प्रमुख डॉ. प्रकाश पांढरमिसे उपस्थित होते. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवन कार्याचा आढावा घेताना त्यांच्या कार्याचा गौरव जगाने केला आहे. त्याची उदाहरणे देताना ते म्हणाले, इंग्लंडमधील जगप्रसिद्ध ऑक्सफर्ड युनिवर्सिटीमध्ये मुख्य प्रवेश द्वाराजवळ आतल्या बाजूस डॉ.बाबासाहेबआंबेडकर ह्यांचे तैलचित्र लावण्यात आले आहे.त्या ठिकाणी असे लिहिले आहे कि, "आम्हाला सार्थ अभिमान आहे कि, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारखा विद्यार्थी आमच्या विद्यापीठात शिकून गेला व त्याने भारत देशाचे संविधान लिहिले आहे." 
         अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठाच्या स्थापनेला ३०० वर्ष पूर्ण झाले, त्या निमित्ताने मागील ३०० वर्षातील या विद्यापीठात सर्वात हुशार विद्यार्थी कोण ? याचे सर्वेक्षण घेण्यात आले, त्यामध्ये सहा विद्यार्थ्यांची नावे सुचविण्यात आली.त्यापैकी पहिल्या क्रमांकावर  डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचे नाव घोषित करण्यात आले. बाबासाहेबांच्या सन्मानार्थ त्या विद्यापीठाच्या मुख्य प्रवेश द्वारावरच डॉ.बाबासाहेब आंबेडकर ह्यांचा ब्रांझ धातूचा पूर्णाकृती पुतळा उभारला आहे. त्याचे उद्घघाटन अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्रअध्यक्ष बराक ओबामा ह्यांच्या हस्ते करण्यात आले.त्या पुतळ्या खाली " सिम्बॉल ऑफ नॉलेज " म्हणजेच " ज्ञानाचे प्रतिक"असे लिहिले आहे "हे आपल्या प्रत्येक भारतीयांसाठी सार्थ अभिमानाची बाब आहे.
      डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या विद्यार्थिदशेपासून अतिशय प्रतिकूल परिस्थितीत ज्ञानार्जन केले. त्यासाठी प्रचंड वाचन केले.सामाजिक परिस्थिती प्रतिकूल असतानाही आपल्या ज्ञानाच्या जोरावर त्या परिस्थितीला  बदलवण्याचा प्रयत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ज्ञानाच्या माध्यमातून केला.  आपले ज्ञान आपल्या सामाजिक बांधवांच्या परिवर्तनासाठी उपयोगात आणले. आजच्या तरुणाईने अशा या थोर महापुरुषांच्या जयंती महोत्सव साजरा करताना "वाद्यांचा गजर करण्याऐवजी विचार ज्ञानाचा जागर करणे" गरजेचे आहे.असे मत डॉ. पांढरमिसे यांनी व्यक्त केले.
     अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.लहू वावरे होते त्यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे ज्ञानाचे अथांग महासागर आहेत. त्यांनी संपूर्ण आयुष्य भारतातील तळागाळातील वंचित उपेक्षित, दुर्लक्षित लोकांच्या हितासाठी सत्कारणी लावले. शिक्षण, आरोग्य, रोजगार, स्त्रियांचे प्रश्न, कामगारांचे प्रश्न, हिंदुकोडबील अशा अनेक महत्वपूर्ण विषयावर बाबासाहेबांनी अनमोल असे कार्य शेवटच्या श्वासापर्यंत केले आहे. त्याची दखल आजच्या तरुणाईने घेणे गरजेचे आहे.असे आवाहन विध्यार्थ्यांना केले.
      या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील  सर्व प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी उपस्थित होते सदर  कार्यक्रमाचे आयोजन नियोजन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा सोनम पवार यांनी केले. विध्यार्थिनी शुभांगी दडस व वैष्णवी बोऱ्हाडे यांनी विध्यार्थी मनोगते व्यक्त केली.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलम धोत्रे हिने केले.तर आभार लखन डिसले याने केले.
close