shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

पारधी समाजाच्या दिव्यांग व विधवा महिलांना पन्नास कुटूंबाना किटचे वाटप..!

आदर्श माता शेवराआई ज्ञानदेव भोसले व ज्ञानदेव शिलेदार भोसले यांच्या हस्ते माझा सत्कार झाला...
पारधी समाजाला पन्नास कुटूंबाना दिव्यांग  व विधवा महिलांना किट वाटप करण्याचे योग आला या नायगाव मध्ये हे माझे नशीब आहे....... समाजसेविका 
राजश्री राजेश तुडयेकर

राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि.५-४-२०२२

माझं स्वप्न होत एक दिवस मी माझ्या आई वडिलांचे नाव रोशन करायचं.  त्यामध्ये माझा जन्म सांगली जिल्हामध्ये झाला. अतिशय मी गरिबीचे दिवस पहिले.ज्या गोष्टी मला मिळाल्या नाही म्हणून नेहमी विद्यार्थींना वह्या पुस्तकं पेन दरवर्षी देत असते , व गरीब कुटूंबाना किट देत असते. या वेळेस वेगळं करायच होतं, पारधी समाजाला कोणी सहकार्य करत नाहीत. जंगलात राहून शिकार करणारा हा समाज ..‌

पारधी समाज हा गावामध्ये अजून ही स्थायिक नाही, घर जागा नाही, शिक्षण नाही म्हणून मी त्यांना शिक्षण व त्यांचं खर्च स्वतः करणार आहे. आज या नायगाव मध्ये पन्नास कुटूंबाना किट द्यायचं ठरवलं राजश्री ताई ने शासनाचे स्कीमची माहिती दिली. शिलाई मशीन, मिरची कांडप, पिठाची गिरणी, ब्युटीपार्लर छोटे मोठे व्यवसाय करण्यास माहिती दिली. तुमच्या जवळ जिद्ध असेल तर मोठया उद्योजीका व्हाल...  पण पारधी, कोळी, दिव्यांग विधवा महिला चंद्रपूरच्या काही आदिवासी महिला, पाटस गाव महातोबाची आळंदी, खामगाव फाटा, बारामती हे सगळे नायगाव ता. हवेली, जिल्हा पुणे सिद्धेश्वर नगर सुरेखा तुकाराम भोसले यांच्या निवास्थानी पन्नास कुटूंबाना किट वाटप केले.

 सांगली जिल्हाची कन्या राजश्रीने कर्नाटक राज्यामध्ये गरिबांना न्याय मिळून देणे प्रत्येक वेळी हेल्प करणे एक महिला असून 40 कुटूंबाना दत्तक घेतले आहे. हे विशेष आदर्श घेण्यासारखे आहे.

त्यांचे हे कार्य पाहून महाराष्ट्र राज्याचे महामहीम राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते अवॉर्ड मिळाला. राज्यश्री ताई राजेश तुडयेकर यांना पुढच्या वाटचालीस उपस्थितांकडून खूप खूप शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी उपस्थितीत प्रमुख पाहुणे राजेश तुडयेकर, आदर्श माता शेवराई ज्ञानदेव भोसले ,ज्ञानदेव शिलेदार भोसले, तुकाराम ज्ञानदेव भोसले, समाजसेविका सुरेखा तुकाराम भोसले,सुजाता ज्ञानदेव भोसले, आखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ चे उप आध्यक्ष पत्रकार सुनिल ज्ञानदेव भोसले पत्रकार, स्नेहा उत्तम मडावी, प्रदीप सुतार, रेवण कुटे, मारुती दामामे, वैशाली भोसले, सचिन भोसले, साईप्रसाद महेंद्रकर अश्विनी आरंडे ,दादासो गायकवाड, नभी शेक ,भूपेंद्र माळी, शुभम सूर्यवंशी यांचे मनापासून आभार मानले.
close