shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

दहावी-बारावीचे निकाल वेळेतच ! शालेय शिक्षण मंत्री गायकवाड || खाजगी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                          मंगळवार दिनांक १९ एप्रिल २०२२ 

दहावी-बारावीचे निकाल वेळेतच ! शालेय शिक्षण मंत्री गायकवाड || खाजगी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू..!!

अहमदनगर : दहावीची (SSC) आणि बारावीचे (HSC) निकाल (Result) वेळेवर लागतील. मार्चमध्ये यासंदर्भात एक मिटिंग (Meeting) झाली आहे. पुढील आठवड्यातही एक मीटिंग होणार आहे. साधारणत पंधरा दिवसांच्या अंतराने दहावी (SSC) आणि बारावीचा निकाल (HSC Result) लागतात. यावर्षी ही निकाल वेळेत लागतील असा विश्वास शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड  यांनी व्यक्त केला.

राज्य मान्यता खाजगी प्राथमिक शिक्षण  व शिक्षकेतर महासंघाच्या राज्यव्यापी सुवर्ण महोत्सवी अधिवेशनात बोलताना शिक्षण मंत्री गायकवाड  बोलत होत्या. यावेळी स्वागत अध्यक्ष आ. संग्राम जगताप , आ. डॉ. सुधीर तांबे , महासंघाचे राज्य अध्यक्ष कां. रं. तुंगार, प्रा. माणिकराव विधाते, मुख्य सचिव प्रकाश देशपांडे, जिल्हाध्यक्ष विठ्ठल उरमुडे, जिल्हा सचिव शेखर उंडे, जिल्हा कार्याध्यक्ष रघुनाथ ठोंबरे, जिल्हा कार्याध्यक्ष अन्सार शेख, शहराध्यक्ष सुभाष येवले, प्रशांत नन्नवरे व राज्यभरातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 

यावेळी शिक्षण मंत्री गायकवाड म्हणाल्या, राज्यामध्ये मराठी माध्यमाच्या शिक्षणामध्ये खाजगी प्राथमिक शिक्षकांचे मोठे योगदान आहे. पूर्वी संस्था चालकांनी ग्रामीण भागासह शहरात शिक्षण संस्था उभा केल्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे मराठी माध्यमाचे शिक्षण मिळत आहे. खाजगी प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत, ते प्रश्न ज्ञात असून लवकरच मुंबई (Mumbai) येथे बैठकीचे आयोजन करू टप्प्याटप्प्याने खाजगी प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले. आ. डॉ. तांबे  म्हणाले, खाजगी शाळेची जबाबदारी शासनाची आहे. उत्तमरित्या मराठी माध्यमाच्या शाळा खाजगी स्तरावर चालवल्या आहेत.


 

केंद्र सरकारचे नवीन शिक्षण धोरणामध्ये पहिली ते बारावी पर्यंतच्या मोफत दर्जेदार व शक्तीचे शिक्षण द्यायचे आहे. खाजगी शाळा म्हणजे सेवाभावी संस्था आहे. शासनाची जबाबदारी मराठी माध्यमाचे शिक्षण देण्याची आहे. आपण सर्वांनी खासगी शाळांना मदत केली पाहिजे. खाजगी संस्थांना मदत करण्याची जबाबदारीही खर्‍या अर्थाने शासनाची आहे. आता विनाअनुदानित शाळा चालवणे शक्य नाही. यासाठी शासन स्तरावर खाजगी संस्था व शिक्षकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करू, जुनी पेन्शन योजना सुरु करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार  यांची भेट घेऊन बैठक घेतली आहे. त्यांनी राज्यमंत्री शंभूराजे देसाई  यांच्या अध्यक्षतेखाली कमिटीची स्थापना केली आहे. स्वागत अध्यक्ष आ. जगताप  यांनी स्वागत केले. राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघाच्या पुस्तकाचे प्रकाशन झाले व विविध ठराव एक मुखाने मंजूर केले.


 
"शाळा सुरू झाल्यानंतर त्यांच्या आजूबाजूला असलेल्या भोंग्यांविषयी निर्णय घेण्यात येईल.14 तारखेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती देशासह संपूण जगात साजरी झाली. डॉ. आंबेडकर यांच्या शिकवणीनूसार देश संघ ठेवला पाहिजे. विश्वबंधुत्वता आणि एकोपा टिकला पाहिजे, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे मंत्री गायकवाड म्हणाल्या."

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600



close