प्रतिनिधी: सुर्यकांत होनप
करमाळा: दि. २८/ करमाळा तालुक्यातील निमगाव हवेली येथे कर्मवीर मधुकरराव नीळ बहुउद्देशीय संस्था यांच्या विद्यमाने आयोजित केलेल्या ई-श्रम कामगार नोंदणी व प्रधान मंत्री किसान सन्मान योजनेची eky नोंदणी कॅम्पचे उदघाटन छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक व माजी पोलीस माधवराव इंगळे यांच्या हस्ते पूजा करून करण्यात आले. यावेळी माजी उपसरपंच विठ्ठल जगदाळे, दत्ता मामा साळुंके, अंगद हराळे, कर्मवीर मधुकरराव नीळ बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र भोसले, संस्थेचे संस्थापक सचिव गणेश नीळ, मधुकर जगताप, मनोहर जगताप, सदाम साळुंके, बाळू जगदाळे, सुभाष जगताप, सोमनाथ जगदाळे, राजेंद्र जगताप, भारत जगताप, बाळू जगताप, राम जगदाळे, लखन मंजुळे, ग्रामपंचायत माजी सदस्या सुमन जगताप, अमोल ढावरे, संतोष वाघमारे, आजिनाथ टाळके, कालिदास नीळ, व इतर ग्रामस्थ उपस्थित होते. या कॅम्पचे आयोजक व सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनेचे अध्यक्ष सतीश नीळ यांनी उपस्थित ग्रामस्थ व मान्यवरांचे आभार मानले .

