श्रीरामपूर । प्रतिनिधी:-
वडाळा महादेव येथे शनिवार दिनांक 30 रोजी जामा मस्जिद येथे त्रंबकेश्वर परिवर्तन मंडळ व मुस्लिम बांधवांच्या वतीने इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी उपस्थितांचे स्वागत करताना रफीक भैया म्हणाले की, आपल्या गावातील सर्व मंडळींनी नेहमीच जातीय सलोखा जपत शांतता व एकता ठेलली आहे. यामुळे गावात कधीही अनुचित प्रकार घडला नाही.यामुळे मला समाधान वाटते.गावातील सर्वांचे अतिशय प्रेमळ व जातीधर्मापलीकडचे संबंध आहेत. यामुळे वडाळा महादेव मध्ये एकतेचे अखंड दर्शन पहायला मिळते. हे गाव जातीधर्माच्या पलीकडचे नाते जपून आहे.सर्व धर्म समभाव येथे ओतप्रोत भरल्याचे दिसून येते .देशात सदैव अखंडता व एकता रहावी यासाठी आपण सर्व हिंदू- मुस्लीम बांधव एकजूट करून गावाला एक नवीन दिशा देण्याचे काम करूया ..असे कार्यक्रमाच्या वेळी रफीक भैया यांनी सर्वांचे मनःपूर्वक स्वागत करून मनोगत व्यक्त केले.
यावेळी गावचे सरपंच कृष्णा पवार तसेच त्यांच्या बरोबर काम करणारे सर्व ग्रामपंचायत सदस्य, परिवर्तन मंडळाचे नेते उत्तम काका पवार, त्र्यंबकेश्वर परिवर्तनना चे सर्व शिलेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुस्लिम समाजाच्या वतीने इतर बांधवांनी देखील सर्वांचे मनापासून स्वागत केले.
गावचे सरपंच कृष्णा पवार यांनीही मुस्लिम बांधवांना भरभरून शुभेच्छा दिल्या. ग्रामपंचायत सदस्य सुजित राठोड यांनीही मनोगत व्यक्त केले तसेच वडाळा सोसायटीचे माजी व्हाईस चेअरमन विनोद मलिक यांनी शुभेच्छा दिल्या व सर्व मुस्लिम बांधवांच्या बरोबर बसून रोजा इफ्तार पार्टीत मनसोक्तपणे गप्पा मारल्या. राष्ट्रवादी काँग्रेस चे तालुकाध्यक्ष सचिन पवार, शिवसेनेचे प्रदीप वाघ तसेच गावातील ग्रामस्थ व विविध पक्षाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

