shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

‘जीपीएस’द्वारे बेकायदेशीर वाहतुकीला बसणार आळा..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.                                            शुक्रवार दिनांक २७ मे २०२२


‘जीपीएस’द्वारे बेकायदेशीर वाहतुकीला बसणार आळा..!!

अहमदनगर : जिल्ह्यातील बेकायदेशीर उत्खनन व वाहतुकीच्या घटनांना आळा बसावा, यासाठी गाैण खनिजाची वाहतूक करणाऱया वाहनांसाठी जीपीएस प्रणाली बसविणे बंधनकारक आहे. यासाठी दि. ३१ मेची मुदत दिली असून जीपीएस प्रणाली महाखनिज या संगणक प्रणालीबराेबर जाेडून घ्यावे, अन्य़था माेटार वाहन कायद्यानुसार कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, अशा इशारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी दिला.
दि. १ जूननंतर गौण खनिजाची वाहतूक करणा-या वाहनांवर जीपीएस प्रणाली बसविलेले नसल्यास संबंधित उत्खनन व वाहतूक अवैध समजण्यात येणार आहे. त्याविरुद्ध महसूल संहिता १९६६ मधील कलम ४८ (७) व ४८(८), महाराष्ट्र गौण खनिज उत्खनन (विकास), महाराष्ट्र जमीन विनियमन, नियम २०१३, मोटार वाहन कायद्याच्या तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल, असेही उपप्रादेश‍िक पर‍िवहन अध‍िकारी पवार यांनी बजावले आहे.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close