बिरेवाडी:- स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मोत्सवानिमीत्त शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेच्या माध्यमातून दरवर्षी भव्यबालसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात येते.
यावर्षी शिबिरात बालकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला. बालसंस्कार शिबीरामध्ये प्रथम सत्रात शिवश्री.शिवनाथभाऊ नाईकवाडी(अ.नगर,जिल्हा संघटक,शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र) यांनी श्री स्वामी समर्थ आध्यात्मिक बालसंस्कार केंद्राच्या माध्यमातून मार्गदर्शन केले. दुसऱ्या सत्रात प्रसिद्ध शिवव्याख्याते आदर्श शिक्षक, बाळासाहेब शिंगोटे सर यांनी छत्रपती शंभुराजांच्या जिवनातील विवीध प्रसंग आणि आदर्श समाज, आदर्श नागरिक यांची कर्तव्य यावर मार्गदर्शन केले तसेच तिसऱ्या सत्रात प्रसिद्ध शिवव्याख्याते ह.भ.प. शिवाजी महाराज दाते (मराठे का हारले पानिपत- कादंबरीचे लेखक) यांनी छत्रपती शंभू राजांचा संपूर्ण जीवनपट अगदी सोप्या भाषेत विद्यार्थ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न केला.
छत्रपती शंभुराजांचा जीवनपट ऐकत असताना सहभागी बालक अतिशय तल्लीन होऊन ऐकत होते.
बालसंस्कार शिबीरास नाष्टा व जेवण व्यवस्था श्री.ज्ञानदेव मोठ्याभाऊ ढेंबरे (माऊली ऊद्योग समुह) व श्री.दिनकर देवराम ढेंबरे (हॉटेल गुरुदत्त) यांनी सहकार्य केले.बालसंस्कार शिबीर प्रसंगी शिवश्री.गणेश श्रीराम (संगमनेर तालुकाध्यक्ष, शिवप्रतिष्ठाण),
शिवश्री.जालींदरशेठ गुळवे(संगमनेर तालुका उपाध्यक्ष, शिवप्रतिष्ठाण),माजी उपसरपंच भास्कर ढेंबरे, बाजीराव ढेंबरे, वैभव सागर, योगेश ढेंबरे, मालक सागर, बबन सागर, गोरक्ष गळंगे(संगमनेर तालुका संघटक, शिवप्रतिष्ठाण), रामदास सागर, प्रतिक ढेंबरे, गोकुळ ढेंबरे आदी मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली.
बालसंस्कार शिबीर यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक तथा प्रदेशाध्यक्ष शिवश्री राहुल बाजीराव ढेंबरे पाटील तसेच शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ यांनी विशेष योगदान दिले.

