बेलापूर बु।ग्रामपंचायतीच्यावतीने पोलीस उपविभागीय अधिकारी संदिप मिटके व पत्रकार ज्ञानेश गवले यांच्या हस्ते शनी देवास अभिषेक..!!
बेलापूर (अमन सय्यद) - दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील अमावस्येला शैनेश्वर जयंती "शैनेश्वर यात्रा" म्हणून श्रीरामपुर तालुक्यातील बेलापूर येथे साजरी केली जाते. या दिवशी शनी देवाचा जन्म झाला होता. विशेष म्हणजे शैनेश्वर जयंती आणि सोमवती अमावस्या एकाच दिवशी आले आहे त्यामुळे शैनेश्वर महाराजांची पूजा करून त्यांना प्रसन्न केले जाते.
बेलापूरातील शनि देवाचे हे जागृत देवस्थान आहे. दर शनिवारी बेलापूरगांवातील व पंचक्रोशीतील भाविक,शनिभक्त या ठिकाणी पूजापाठ व दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येतात,काल याठिकाणी शैनेश्वर जन्मोत्सव मोठ्या उत्साहात अगदी भक्तीमय वातावरणात पार पडला आहे.
शनैश्वर यात्रे निमित्ताने बेलापुर बु।। ग्रामपंचायतीच्यावतीने काल सोमवारी सायंकाळी ६.०० वाजता पारंपारिक दशअवतारी आखाडी (देव-देवतांचे मुखवटे मिरविणे) कार्यक्रम आयोजित केला होता.मंदिराच्या चौथरा आणि परिसरात फुलांची व झेंडा चौकापासून मंदिरापर्यंत विद्युत रोषणाई (लायटिंग) मंदिराला फुलाची सजावट करण्यात आली आहे.शनैश्वर यात्रेनिमित्त बेलापूर बु।।ग्रामपंचायतीच्यावतीने पोलीस उपविभागीय अधिकारी संदिप मिटके साहेब व पत्रकार ज्ञानेश गवले यांच्या हस्ते शनी देवास अभिषेक करण्यात आला.
यावेळी जि.प.सदस्य शरद नवले, सरपंच महेंद्र साळवी, उपसरपंच अभिषेक खंडागळे, ग्रा.प.सदस्य चंद्रकांत नवले, रवींद्र खटोड, जालिंदर कुऱ्हे, साहेबराव वाबळे, विष्णुपंत डावरे, प्रफुल्ल डावरे, दिपक वैष्णव,रामेश्वर सोमाणी,पुरुषोत्तम भराटे, गोविंदराव खरमाळे,भरतलाल सोमाणी, बाळासाहेब दाणी, प्रकाश कु-हे,विलास मेहेत्रे, शशिकांत नवले, दादासाहेब साठे, दादासाहेब कुताळ, दत्तात्रय मुसमाडे,मास्टर हुडे,डॉ.सुधीर काळे,केशव कुऱ्हे, विजय कुऱ्हे, सुधीर नवले,विशाल आंबेकर, किरण गागरे, महेश कुऱ्हे, भैय्या शेख,रमेश लगे,सौरभ कापसे, हरिहर काळे, महंत काळे, राजेंद्र कर्पे,रमेश वाबळे, सोमनाथ जावरे,दत्तात्रय म्हस्के, मारुती गायकवाड, रमेश कुटे,भूषण चंगेडिया, सतीश सोनवणे, बाळासाहेब शेलार,महेश ओहोळ,मोतीलाल सोन्ने,संतोष क्षीरसागर,मधुकर गायकवाड,बाबासाहेब प्रधान,म्हाळु खोसे, सचिन नगरकर,रवी मेहेत्रे
बेलापूर गावातील हिंदू-मुस्लीम उर्स कमिटीच्यावतीने बेलापूरच्या शनि यात्रेनिमित्त शनि महाराजांना पुष्पहार अर्पण करताना ऊस कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व इतर सदस्य गणीभाई सय्यद, बाबुलालभाई शेख, समीरभाई सय्यद, युवक कार्यकर्ते मोसिन सय्यद, गफारभाई, फिरोजभाई बाबा सय्यद,समीर जागीरदार, गणेश संचेती, रवींद्र खटोड व शनी यात्रा कमिटीचे सदस्य भाविक भक्त व पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.


