*माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते १५ मे रोजी ड्रीम्स् राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेचे बक्षीस व क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराचे वितरण*
इंदापूर प्रतिनिधी: महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन, पुणे जिल्हा हौशी ॲथलेटिक्स असोसिएशन व ड्रीम्स् अकॅडमी सराटी यांच्या संयुक्त विद्यमाने ड्रीम्स् राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा 2022 बक्षीस वितरण व क्रीडा प्रोत्साहन पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 15 मे रोजी इंदापूर येथील आय कॉलेज मधील मैदानामध्ये सायंकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त तसेच महाराष्ट्र ॲथलेटिक्सअसोसिएशनचे चेअरमनअभय छाजेड, राज्यकर उपायुक्त, मोठे करदाते विभाग मुंबईचे चेतन भिंगारे आणि विशेष निमंत्रित पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, तालुका क्रिडा अधिकारी महेश चावले, गटविकास अधिकारी विजयकुमार परीट, गटशिक्षणाधिकारी राजकुमार बामणे उपस्थित राहणार आहेत.
ड्रीम्स् अकॅडमीच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त ड्रीम्स् राज्यस्तरीय मैदानी स्पर्धा 2022 चे आयोजन केले असून दि.15 मे रोजी सकाळी 7 वाजल्यापासून सायंकाळपर्यंत आय कॉलेज (कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय) इंदापूर मधील मैदानात धावणे, लांब उडी , गोळा फेक ,थाळी फेक या वेगवेगळ्या क्रीडा प्रकारात विविध वयोगटात ही स्पर्धा होणार आहे.स्पर्धेनंतर माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षिस वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
ड्रीम्स् अकॅडमी सराटीचे अध्यक्ष प्रवीण नानासाहेब कोकाटे,विश्वस्त कृष्णदेव क्षिरसागर, विश्वस्त अमोल गोडसे यांनी राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

