shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

केदारनाथ यात्रेतील एक अविस्मरणीय सुखद अनुभव


केदारनाथ वरून बद्रीनाथ धामाचा प्रवास सुरू झाला. रस्त्यावर भक्तांच्या वाहनांची वर्दळ खूप मोठी होती. अचानक ट्रैफ़िक जाम लागला.समोरच्या मिलिटरी वाहनात एक सैनिक गडबडा लोळत होता.. बाकी सैनिक फर्स्ट एड करण्याचा प्रयत्न करीत होते...!

      आमच्या सोबत कोपरगाव चे डॉ संतोष आव्हाड व डॉ निलिमा आव्हाड हे यात्रा करत होते... आमचे डॉक्टर व आम्ही गाडी जवळ गेलो.. डॉक्टर दांपत्य सेवेत जुटले.. क्षणात निदान केले.. मुतखड्याच्या वेदना आहेत.. त्यांनी आपल्या बॅग मधून दोन इंजेक्शन काढले व सैनिकाला दिले.

      ट्रैफ़िक ची कोंडी नको म्हणून डॉक्टर दांपत्य सैनिकांच्या गाडीत बसले... आमची प्रवासाची दिशा एक होती.. थोड्याच वेळात सैनिकाला बरे वाटले.., हे सैनिक ११ मराठा लाईफ इनफंट्री मधील होते... त्यातील काही अहमदनगरचे होते.. आमच्याजवळ असलेले घरी बनवलले लाडू चिवडा फराळ आमच्या महिला सह यात्रींनी त्यांना दिला... तुम्ही रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून पहारा देता म्हणून आम्ही व आमचे कुटुंब देश शांत झोपूशकतो... बदल म्हणून घरी बणवलेले घेऊन जा... त्यांनी देखील आभार मानत आनंदाने स्विकारले.
त्यांची व या प्रसंगाची आठवण म्हणून सोबत चे छायाचित्र... डॉ संतोष आव्हाड हे होमिओपथी प्रॅक्टिस करतात त्यांनी देखील होमिओपथी चे उपचार केलेत.. एक महिन्याचा जवळ असलेला डोस दिला...

डॉ संतोष व डॉ निलिमा आव्हाड ह्या दांपत्याचे खरच मनापासून मनापर्यंत शतशः: आभार*
संजय भास्करराव काळे
close