पायाला दुखापत होऊनही युवा सहकारी स्वप्निल गुणवरे यांच्या लग्नकार्यास सर्वसामान्यांसाठी झटणारे युवा नेतृत्व राजवर्धन पाटील यांची उपस्थिती.
इंदापूर प्रतिनिधी: निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन पाटील यांच्या पायाला नुकतीच दुखापत झाली आहे.युवा सहकारी चि.स्वप्नील व चि.सौ. कां. सुप्रिया यांच्या विवाहानिमित्त आज श्याम गार्डन, भिगवण येथे पायाला दुखापत होऊन देखील लग्नकार्यास उपस्थित राहून वधुवरास वैवाहिक जीवन सुख समृद्धीचे व भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा देत त्यांचे अभिनंदन केले.
राजवर्धन पाटील हे पायाला फॅक्चर असतानाही आपल्या सहकार्याच्या लग्न समारंभाला आवर्जून उपस्थित राहिले आणि त्यांना शुभेच्छा दिल्या ही जनसामान्यांच्या नेतृत्वाची झलक यावेळी पाहायला मिळाली. आपले दुःख बाजूला सारून जनसामान्यांसाठी झटणाऱ्या त्यांच्या सुखदुःखात सामील होणाऱ्या नेतृत्वाचा यावेळी गुणवरे आणि कुसकर परिवाराने सत्कार केला. याप्रसंगी स्नेहबंध जिव्हाळा पाहावयास मिळाला.

