shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

जेष्ठ पत्रकार मनोजकुमार आगे यांचा अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर शिर्डी संस्थान कडून यथोचित सन्मान...!!


शिर्डी । प्रतिनिधी:- श्रीरामपूर येथील रहिवासी असलेल्या व जय बाबा दैनिकाच्या माध्यमातून जनसामान्यांचे प्रश्न निःपक्ष व निर्भिडपणे मांडून आपला वेगळा ठसा उमटवून महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून धमाल करणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे पत्रकार मनोजकुमार आगे होत...!

       मनोजकुमार आगे यांनी अतिशय कष्टातून आपले साम्राज्य निर्माण केले असून त्यांचे पत्रकारितेतील व सामाजिक योगदान अतुलनीय व वाखाणण्याजोगे आहे. नगर जिल्ह्यातील सामान्य जनतेचे प्रश्न  प्रखरपणे मांडण्याचे काम त्यांनी अविरतपणे केले आहे.त्यामुळेच पत्रकारितेत आगे यांचे आघाडीचे नावलौकिक आहे. 



           दिनांक ३ मे २०२२ अक्षय तृतीयेच्या  शुभमुहूर्तावर मनोजकुमार आगे यांनी साई बाबांचे चरणपुजा केल्यानंतर आशिर्वाद घेत असताना संस्थानच्या वतीने प्रमुख मान्यवर लोकनियुक्त मा.नगराध्यक्षा व श्री साईबाबा संस्थानच्या विश्वस्त ‌अनुराधाताई , विश्वस्त दंडवते पाटील, श्रीरामपूर चे नगरसेवक राजेंद्र पवार, आदित्य आदीक यांच्या उपस्थितीमध्ये साईबाबा मंदिरात मनोजकुमार आगे यांचा सन्मान पुर्वक सत्कार करण्यात आले..!

        यावेळी विश्वस्त दंडवते पाटील नगसेवक राजेन्द्र पवार आदित्य आदिक आदी मान्यवर उपस्थित होते.
close