shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

विशेष प्रकल्पचे उपअभियंता आयरेकर यांचा पदोन्नती निमित्ताने करण्यात आला सत्कार..!

कोल्हापूर । प्रतिनिधी:-
पन्हाळा चे विशेष प्रकल्प उपविभागाचे उप अभियंता श्री आयरेकर यांची कार्यकारी अभियंता म्हणून पदोन्नती झाल्या मुळे येथील कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने श्री आयरेकर यांचा उत्साह पुर्ण वातावरणात सन्मान पुर्वक सत्कार करण्यात आला.

या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा विशेष प्रकल्प विभागाचे कार्यकारी अभियंता श्री काटकर यांनी श्री आयरेकर यांचा यथोचित सन्मानपूर्वक सत्कार केला.तसेच श्री आयरेकर यांचे कामाचे तोंडभरून कौतुक व स्तुती करून त्यांनी पन्हाळा तालुक्यातील अनेक भेडसावत असलेल्या समस्यांची उकल करून आपल्याला नेहमीच मोलाची साथ दिली.त्याचप्रमाणे आपण नेहमीच त्यांचे बरोबर अनेक विषयांवर चर्चा करून जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सतत प्रयत्न केल्याचे सांगितले. याचबरोबर त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या..!

यावेळी उप अभियंता श्री. धनंजय भोसले यांनी श्री आयरेकर यांच्या कामाचे कौतुक करून अधिकारी असावा तर आयरेकर साहेबांप्रमाणे...!असे गौरवोद्गार काढले.. कारण त्यांचे काम म्हणजे अतिशय उल्लेखनीय व वाखाणण्याजोगे आहे. त्यांच्या  कामाची  पद्धत शुक्ष्म निरीक्षण करून निर्णय घेणे ; काम कितीही अवघड असले  तरी न डगमगता यशस्वी रीतीने पार पाडणे; हाती घेतलेले काम लिलया पार पाडणे असे अनेकविध‌ गुण त्यांचे कडे आहेत. यामुळे कधी कधी आपल्यालाही अडचण आल्यावर त्यांचे योग्य व मोलाचे मार्गदर्शन लाभले असल्याचे आवर्जून सांगितले. तसेच त्यांना भावी वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या..!

यावेळी कर्मचारी यांनी देखील श्री आयरेकर यांनी नेहमीच वरीष्ठ अधिकारी असले तरी कुटूंबातील प्रमुख व्यक्ती असल्याप्रमाणे नेहमीच सहकार्य केले.. सर्व कर्मचारी यांनी आपणांस प्रेमळपणाची वागणूक दिल्याचे व्यक्त केले.असे प्रामाणिक आणि तळमळीने काम करणारे अधिकारी या काळात क्वचितच लाभतात.तसे अधिकारी आयरेकर यांच्या रूपाने आम्हांला लाभले  असेही कर्मचारी वृंदा ने व्यक्त केले.
 
या सत्कार समारंभास उत्तर देतांना श्री आयरेकर म्हणाले की मी साधारण व्यक्ती असून तुमच्या पेक्षा काही वेगळा नव्हतो. तुम्ही सर्वांनी मला जी आदराची व कुटुंब प्रमुखाप्रमाणे वागणूक दिली व सहकार्य केले त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे. जेव्हा जेव्हा कोणालाही काम करत असताना अडचण येत असेल त्यावेळी मला निं: संकोच पणे नक्की समस्या कळवा..मी तो विषय सोडविण्यासाठी जरूर प्रयत्न करेन..! आपण आजपर्यंत साथ दिली तसेच पुढे ही साथ द्यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी श्री आयवाळे, श्री. कुंदन कुमार, श्रीअमोल कोळी, शिर्डी एक्सप्रेस चे संपादक रमेश जेठे (सर),सौ.पूनम पाटील,व कर्मचारी वृंद, इतर महिला कर्मचारी उपस्थित होते.
close