शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. शनिवार दिनांक २३ मे २०२२
धामोरी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सौ.वाडगे तर व्हा. चेअरमन पदी सौ. कोहकडे यांची सर्वानुमते निवड..!!
: संस्थेच्या स्थापनेपासून महिला चेअरमन व्हा. चेअरमन होण्याचा मान पहिल्यांदाच
राहुरी : धामोरी खुर्द विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या चेअरमन पदी सर्वानुमते लक्ष्मीबाई विठ्ठल वाडगे तसेच व्हा. चेअरमन पदी मीराबाई दिलीप कोहकडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.
संस्थेच्या स्थापनेपासून महिला चेअरमन व्हा. चेअरमन होण्याचा मान यांना मिळाला. कै. धोंडिभाऊ सोनवणे यांनी ज्या पद्धतीने सर्व घटकांना न्याय दिला त्याच पद्धतीने यापुढेही कामकाज केले जाईल असे आश्वासन बाबासाहेब सोनवणे यांनी दिले.
या निवडीला सर्व संचलकांनी बिनविरोध पाठिंबा दिला.
यावेळी बाबासाहेब सोनवणे, विलास सोनवणे, रामनाथ सोनवणे, राजेश सोनवणे, संभाजी कल्हापुरे, सुदाम कुसमुडे, अशोक पारखे, भाऊसाहेब जाधव, भाऊसाहेब खेडेकर, नानासाहेब खेडेकर, संजय हरिश्चंद्रे हे संचालक उपस्थित होते. या प्रसंगी संदीप सोनवणे,देवराम खेडेकर, शुभम सोनवणे, रोहित खेडेकर तसेच निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खंडेराव साहेब, चव्हाण साहेब, सचिव शेळके साहेब आदी. उपस्थित होते.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

