'काय चाललय तुमच्या इंदापुरात 'अतुल झगडे यांना विचारत खासदार शरद पवार यांनी केलीअस्थेने चौकशी?
खा. शरद पवार यांची इंदापूर राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष अध्यक्ष अतुल झगडे यांनी घेतली सदिच्छा भेट.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अतुल झगडे व त्यांच्या पत्नी सरपंच रूपाली झगडे यांनी आज (दि.३०मे) बारामती येथील गोविंद बाग या ठिकाणी जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीयअध्यक्ष खासदार शरद पवार यांची भेट घेतली असता पवार साहेबांनी अतुल झगडे यांना थेट अस्थेने चौकशी करत विचारले" काय चाललय तुमच्या इंदापुरात?"
यावेळी अतुल झगडे म्हणाले की इंदापूर तालुक्यामध्ये दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची विकास कामे चालू असून त्यांच्या माध्यमातून रोज भूमिपूजन व उद्घाटन तालुक्यात होत असतात ते सर्वांना बरोबर घेऊन काम करतात .
त्यावेळी खासदार शरद पवार म्हणाले की, दत्तामामा हा अतिशय चिकाटीचा माणूस आहे. त्याची काम करण्याची पद्धत वेगळी आहे. कामाच्या बाबतीत अतिशय जागरूक व काम करून घेण्याची चिकाटी त्यांच्याकडे आहे.
अतुल झगडे माहिती देताना म्हणाले खासदार शरद पवार यांनी वेळ काढून माझ्या सारख्या एका कार्यकर्त्याची मनमोकळेपणाने गप्पा मारल्या हा दिवस माझ्यासाठी अतिशय आनंदाचा आहे.

