shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कर्तबगार, कार्यकुशल, संघटनशील नेतृत्व म्हणजे निमगाव केतकीचे सुपुत्र मुक्तार मुलानी.

कर्तबगार, कार्यकुशल, संघटनशील नेतृत्व म्हणजे निमगाव केतकीचे सुपुत्र मुक्तार मुलानी.

अभिष्टचिंतन दिनानिमित्त केतकेश्वर सांस्कृतिक भवन निमगाव केतकी येथे रक्तदान शिबिराचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन.

४१ वा अभिष्टचिंतन दिनानिमित्त विशेष लेख.
इंदापूर प्रतिनिधी: निमगावकेतकी चे सुपुत्र आणि निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे सिव्हिल इंजिनियर मुक्तार शाहिस्तेखान मुलानी यांचा ४१वा अभिष्टचिंतन दिन संपन्न होत असून यानिमित्त दिनांक २५ मे २०२२ रोजी केतकेश्वर सांस्कृतिक भवन या ठिकाणी इंदापूर तालुका मुस्लिम चारीटेबल ट्रस्ट व मुस्लिम युवक संघटना, आलिशान व केतकेश्वर उद्योग समूह निमगाव केतकी यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे व वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
 
इंदापूर तालुक्यातील निमगावकेतकी येथील शाहिस्तेखान मुलानी व जुबेदा मुलानी यांचे सुपुत्र मुक्तार मुलानी यांचा जन्म  २५ मे १९८२ साली झाला असून त्यांचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण निमगावकेतकी येथे झाले. पुढे ते उच्च माध्यमिक ते पदवी पर्यंतचे शिक्षण त्यांनी माळेगाव कॉलेज बारामती याठिकाणी घेतले. 
त्यानंतर त्यांनी अनुभवासाठी पुणे येथे रचना कंट्रक्शन मध्ये सिव्हिल इंजिनिअर म्हणून दोन वर्ष काम केले. त्यांच्या या अनुभवाचा आणि अभ्यासाचा विचार करून त्यांना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी निरा भिमा सहकारी साखर कारखाना येथे सिव्हिल इंजिनियर म्हणून त्यांची नेमणूक केली. गेली वीस वर्षापासून मुक्तार मुलानी हे नीरा-भीमा कारखान्यामध्ये सिविल विभागाचे खातेप्रमुख म्हणून काम पाहत आहेत. त्यांच्या आत्ता पर्यंतच्या कार्यकाला मध्ये निरा भिमा सहकारी साखर कारखान्याची अनेक वास्तु त्यांच्या कार्यकाला मध्ये उत्तम रित्या उभारल्या गेल्या आहेत.  तसेच त्यांनी तालुका व इतर भागांमध्ये अनेक वास्तू उभारल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या या कार्य कुशलतेने सर्वसामान्य ते मोठ्यापर्यंत ते सर्वांना आपलेसे वाटत असतात. अशा या कार्यक्षम नेतृत्वाचा अभिष्टचिंतन दिन हा त्यांच्या चाहत्यांचा उत्सव दिन म्हणून साजरा होत असतो. त्यांच्या या अभिष्टचिंतना निमित्त तीन चार दिवसापासून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव त्यांच्यावर होत आहे. 
मुक्तार मुलानी हे सामाजिक व युवकांमध्ये व्यवसायिक क्षेत्रातही त्यांनी अनेक युवकांना उभारी देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य  केले त्यांच्या या कार्यकर्तृत्ववान विचारांचा निश्चितच नवीन उद्योजकांना उभारी देणारा व प्रेरणा देणारा ठरत आहे. तसेच त्यांनी मुस्लिम बांधवांमध्ये  सर्वसमावेशक असा कुशल संघटन तयार करून मुस्लिम बांधवांच्या अडचणी सोडवण्याचा ही प्रयत्न केलेला दिसत आहे. तसेच निमगावकेतकी येथे जनहित ग्रामीण बिगरशेती पतसंस्था निर्माण करून त्या पतसंस्थेचे चेअरमन पदी त्यांचे बंधू वस्ताद असलम मुलानी यांच्या माध्यमातून अनेकांना आर्थिक हातभार देण्याचे कार्य त्यांनी केलेले दिसत आहे. त्यांच्या या जडणघडनेमध्ये त्यांचे मित्र, नातेवाईक व मार्गदर्शक मान्यवर यांचाही विशेष वाटा  असल्याचे दिसत आहे.अशा या नेतृत्वाचा वाढदिवस निमगावकेतकीसह इंदापूर तालुक्यात वेगवेगळ्या माध्यमातून शुभेच्छा सह अभिष्टचिंतन साजरा होत आहे.
close