shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

कालठण येथील उत्कर्ष विद्या मंदिर विद्यालयात २७ वर्षाच्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न. २७ वर्षानंतर भरला १९९४-९५ बॅचच्या इयत्ता १० वी च्या विद्यार्थींचा वर्ग.

कालठण येथील उत्कर्ष विद्या मंदिर विद्यालयात २७ वर्षाच्या आठवणींना उजाळा देत माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न.

  
२७ वर्षानंतर भरला १९९४-९५ बॅचच्या इयत्ता १० वी च्या  विद्यार्थींचा वर्ग.
इंदापूर प्रतिनिधी: लहानपणीच्या आठवणींना उजाळा देत 
कालठण नं १ (ता इंदापूर) येथील 
उत्कर्ष विद्या मंदिर विद्यालयात  तब्बल   २७ वर्षांनंतर सन १९९४-९५ एस. एस. . सी. बॅचच्या  माजी विद्यार्थ्यांचा व शिक्षकांचा स्नेहमेळावा दि .८ मे २०२२रोजी शाळेच्या  प्रांगणात उत्साहात संपन्न झाला. 
सुमारे २७ वर्षांनंतर भेट झाल्यामुळे माजी विद्यार्थ्यांच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू तरळले. 
यावेळी शालेय जीवनातील आठवणींना सर्वांनी उजाळा दिला, काहींनी आपल्या आनंदाश्रूंना वाट मोकळी करून दिली. 
याप्रसंगी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक तुकाराम जाधव हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक मनोहर खुसपे हे होते. 
 पद ,प्रतिष्ठा बाजूला ठेवून सर्व माजी विद्यार्थी अगदी उत्साहाने एकत्र जमले. 
या माजी विद्यार्थ्यांनी शाळेसाठी ग्रीन डिजीटल बोर्ड , शैक्षणिक साहित्य देऊन, वृक्षारोपण करून व गुरूजनांचा सत्कार करण्यात येऊन स्नेह मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला. 

या प्रसंगी माजी शिक्षक विलास जाधव, दादासाहेब घोगरे, सूर्यकांत फडतरे, ज्ञानदेव मदने, नजरूद्दिन शेख, दत्तात्रय रूपनवर, अशोक भोईटे, पद्मजा वाघमोड़े, शारदा जगताप आदी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.
 
सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी 
विकास सावंत , भारत बोंगाणे,  संपत जगताप, आजिनाथ कचरे,कुंडलीक कांबळे,ब्रम्हदेव सपकळ,सारीका चव्हाण,सतिश जावळे, योगेश भोसले, दिपक भिसे, प्रशांत गटकूळ, अशोक जगताप, शंकर जावळे महादेव कदम आदींनी परिश्रम घेतले. 
सदर  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जगताप  व सारीका चव्हाण यांनी केले.उपस्थित सर्वांचे आभार मानले.
close