shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

फूले, शाहु महाराज जयंती निमित्त राज्यस्तरीय प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन


जनकल्याण फाउंडेशनचा उपक्रम

 प्रतिनिधी : संजय वायकर

नगर : ९  / महात्मा ज्योतिराव फुले व राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या संयुक्त जयंती निमित्ताने राज्यस्तरीय ऑनलाईन  प्रश्नमंजुषा स्पर्धा अहमदनगर येथील जनकल्याण फाउंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते पियुष रेवतकर  यांच्या नेतृत्वात घेण्यात येणार आहे.

 या प्रश्नमंजुषा स्पर्धेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे देशासाठी योगदान, महात्मा फुले यांचे साहित्य, शाहू महाराजांचा इतिहास , सामाजिक कार्य व स्त्री शिक्षण चळवळ, भारतीय संविधान, इतर महापुरुष व सामान्य-ज्ञान विषयावर प्रश्न असतील. 

या स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय तीन बक्षिसे ठेवण्यात आली आहे. प्रथम बक्षीस २००० रु व पुस्तकांचा संच, द्वितीय बक्षीस १००० रु व पुस्तकांचा संच, तृतीय बक्षीस ५००  रु व पुस्तकांचा संच असून प्रत्येक सहभागी स्पर्धकास ई- सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. या स्पर्धेमध्ये स्पर्धकांना ६० मिनीट मध्ये १०० प्रश्न सोडविणे गरजेचे आहे. 

११ एप्रिल ला ही स्पर्धा होणार आहे.  स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी ८७६७०२२०७५ या नंबरवर संपर्क साधावा व स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
close