shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

आमदार लहुजी कानडे यांच्याकडून,हजरतकाझीबाबा दर्गाहला फुलांची चादर अर्पण..!


श्रीरामपूर । प्रतिनिधी :-
शहरातील सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले हजरत काझीबाबा दर्गाहमध्ये फुलांची चादर आर्पण करताना आमदार लहुजी कानडे,अशोक नाना कानडे,अरुण पाटील नाईक, जहागिरदार,हाजी मुजफ्फरभाई शेख, ऍड.समिनभाई बागवान, माऊली मुरकुटे,आबा पवार, सतीष बोरडे,राजू औताडे, दानिश शेख,साजीद शाह,रफिक शौकत शेख आदी मान्यवर उपस्थित होते.

     हजरत काझीबाबा दर्गाह यांचा ऊर्स असल्याने आज सोमवार दिनांक १६ मे २०२२ रोजी सायंकाळी संदलचा कार्यक्रम होणार आहे,तसेच उद्या मंगळवार दिनांक १७ मे रोजी वॉर्ड क्र.२ येथील शहिद अय्यूबभाई चौक, काझीबाबा ऊर्स मैदानावर सायंकाळी ६ वाजता,मुंबई येथील सुप्रसिद्ध कव्वाल अजिम नाजा यांचा शानदार कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे तसेच परवा बुधवार दिनांक १८ मे रोजी सुप्रसिद्ध कव्वाल वसीम साबरी आणि करिष्मा ताज यांचा कव्वालीचा कार्यक्रम होणार आहे,तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा असे अवाहनही संयोजक मा.नगरसेवक हाजी मुजफ्फरभाई शेख,फतेह ऍंड पार्टीचे अध्यक्ष दानिश शेख,ऊर्स कमेटीचे अध्यक्ष मा.नगरसेवक दिलीप नागरे तथा ऊर्स कमेटीने  केले आहे.
close