बीड : बीडच्या धामणगाव घाटात कारचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील चौघांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. मृत प्रसिद्ध व्यापारी कुटुंबातील असल्याचे बोलले जात आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेबाबत पोलिस तपास करीत आहेत.
याबाबत माहिती अशी की, प्रसिद्ध व्यापारी टेकवाणी यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. त्यांच्या कुटुंबातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. गाडीमध्ये पाच जण होते. ते पुण्याहून बीडकडे येत असताना धामणगाव घाटात कारचा अपघात झाला आहे. कार थेट रस्त्याच्या कडेला धडकल्याने यामध्ये चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.
दरम्यान, सुनील टेकवाणी शंकर टेकवाणी सतीश टेकवाणी यांच्यासह आणखी एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलीसांनी घटनास्थळावरून 4 मृतदेह ताब्यात घेतले असून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. दरम्यान, एकाच कुटुंबातील चौघाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.


