श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचेच सर्व उमेदवार निवडून येतील - गुलाबराव पवार.
वडापुरी येथे श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनल च्या वतीने श्रीनाथ मंदिरात फोडला प्रचाराचा नारळ .
श्री नाथ वडापुरी वि. का. सेवा सह संस्था मर्यादित वडापुरी संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणूकीसाठी मतदान २२ मे रोजी होणार.
इंदापूर प्रतिनिधी: इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील श्री नाथ वडापुरी विकास कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्यादित वडापुरी या सोसायटीचे निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला असून यामध्ये दोन पॅनल निवडणुकीसाठी उभे असून त्यातील श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनल च्या वतीने आज दिनांक ११ मे २०२२ रोजी सकाळी वडापुरी चे ग्रामदैवत श्रीनाथ मंदिरात प्रचाराचा प्रारंभ श्रीफळ फोडून करण्यात आला. यामध्ये श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचे प्रचारप्रमुख किसन सावंत, दत्तात्रय शिर्के, निवृत्ती थोरात, राजेंद्र पाटील यास प्रकाशक व उमेदवार सभासद उपस्थित होते.
यावेळी श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचे सर्व उमेदवार निवडून येतील आणि त्यासाठी सर्व उमेदवार सभासद हेच प्रचारक म्हणून काम करतील आणि पॅनल भरघोस मतांनी निवडून येईल असा विश्वास माजी मुख्याध्यापक व ज्येष्ठ उमेदवार गुलाब निवृत्ती पवार यांनी यावेळी व्यक्त केला.
तसेच या पॅनलचे चिन्ह चहाची किटली असून तेरा ही उमेदवाराचे चिन्ह चहाची किटली आहे सर्वच्या सर्व उमेदवार निवडून येतील यासाठी सर्वांच्या वतीने प्रचाराची रणनीती ठरविण्यात आली दिनांक २२ मे २०२२ रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडापुरी येथे होणार आहे.
श्री काळभैरवनाथ शेतकरी विकास पॅनलचे उमेदवार खालील प्रमाणे:
सर्वसाधारण मतदार संघ दत्तात्रय उत्तम काटकर,
रमेश निवृत्ती गायकवाड, बाळू तुकाराम जाधव ,राजेंद्र विठ्ठल तोबरे, पांडुरंग मल्हारी देवकर, गुलाब निवृत्ती पवार ,हरिदास रामचंद्र फडतरे ,ज्ञानदेव रामचंद्र शिर्के.
इतर मागास वर्ग मतदारसंघ:
प्रल्हाद राजाराम जाधव.
महिला राखीव मतदारसंघ:
सविता ज्ञानेश्वर काटकर, नंदा तानाजी जाधव.
भटक्या जाती विमुक्त जाती विशेष मागास प्रवर्ग मतदार संघ:
तानाजी पांडुरंग पिंगळे.
अनुसूचित जाती जमाती मतदार संघ:गोरख किसन चंदनशिवे

