वृत्तपत्र जाळून दहशत माजविणाऱ्या समाज कंटकांवर पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी,राहुरी तालुक्यातील पत्रकारांची एकमुखी मागणी
राहुरी तालुका प्रतिनिधी जावेद शेख दि. ९-५-२०२२
राहुरी तालुक्यातील लोकप्रिय असलेले दैनिक सार्वमंथन यामध्ये अवैध व्यावसायांवर कारवाई व्हावी अशा अशयाची बातमी छापून आल्याचा राग मनात धरुन तालुक्यातील वळण येथे काही समाजकंटकांकडून सदरील वर्तमानपत्र जाळून दहशत माजविण्याची घटना घडली असुन या घटनेच्या निषेधार्थ राहुरी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी पोलीस प्रशासनाला निवेदन देत निषेध व्यक्त केला आहे.
अवैध व्यवसायाची बातमी सायंदैनिक सार्वमंथन या वर्तमानपत्रात छापून आली होती.
या बातमीचा राग मनात धरून राहुरी तालुक्यातील वळण येथील अवैध व्यवसाय करणाऱ्या व गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांनी सायंदैनिक सार्वमंथनने बातमी प्रकाशित केल्याचा राग मनात धरून काल शनिवार दिनांक ७ मे रोजी सायंदैनिक सार्वमंथन या अंकाचे पार्सल नेहमीच्या एका ठिकाणी ठेवण्यात आले होते.यातील जगन्नाथ व कुशिराम, रा. प्रिंप्री वळण, हे दोघेही दारूच्या खुप नशेत होते ज्याठिकाणी सदरील सायंदैनिकाचे अंक ठेवले होते त्या टपरीवर गलुलीद्वारे खडे मारत, पुन्हा याठिकाणी वर्तमानपत्र ठेवायचे नाही असे म्हणत वर्तमानपत्राचे पार्सल हिसकावुन घेत रस्त्यावर जाळले आणि गावात दहशत माजवली आहे,अशा समाजकंटक प्रवृत्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाखल करुन कठोर कारवाई करावी व संबंधित वर्तमानपत्राच्या संपादकाना पोलीस संरक्षण मिळावे अशी मागणीही यावेळी तालुक्यातील पत्रकारांकडून करण्यात आली आहे.
या निवेदनावर अधिस्वीकृती धारक ज्येष्ठ पत्रकार निसारभाई सय्यद,अनिल कोळसे,रफिक शेख,गणेश विघे,कर्णा जाधव, आकाश येवले, विजय येवले, प्रसाद मैड, अनिल देशपांडे, विलास कुलकर्णी,श्रीकांत जाधव, राजेंद्र वाडेकर, राजेंद्र उंडे,संजय कुलकर्णी, ऋषीकेश राऊत, सोमनाथ वाघ,मनोज साळवे, मनिष पटेकर, जावेद शेख, सतिश फुलसौंदर,
शरद पाचरणे संतोष जाधव, संजय संसारे,वृत्तपत्र विक्रेता अल्ताफ शेख आदी उपस्थित होते.

