shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे नेते सचिन अहिर,गोविंदराव मोहिते यांनी चलो राजभवन रॅलीला पाठिंबा देऊन जागतिक कामगार दिनाच्या दिल्या शुभेच्छा..!!


जगदीश का. काशिकर,
 कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
         
मुंबई: कामगारवर्गाचे अस्तित्व धोक्यात आणणारे कामगार कायदे केंद्र सरकारने मागे घ्यावे,या मागणीसाठी कामगार संघटना संयुक्त कृती समितीने रविवार १ मे जागतिक कामगार दिनी,चलो राजभवनचा नारा दिला आहे.त्याचे राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष सचिनभाऊ अहिर, सरचिटणीस गोविंदराव मोहिते यांनी स्वागत करून केंद्र सरकारचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.
   

जागतिक कामगार दिनाच्या कामगार वर्गाला शुभेच्छा देताना, महाराष्ट्र वर्धापन दिना बाबत म्हटले आहे,संयुक्त महाराष्ट्राचा लढा त्याग आणि निष्ठेतून उभा राहिला आणि १०५ हुतात्म्यांच्या बलिदानातून संयुक्त महाराष्ट्र जन्माला आले. या मध्ये गिरणी कामगारांचे योगदान महत्त्वाचे ठरले आहे.या हुतात्म्यांना अभिवादन करून,महाराष्ट्राचा वर्धापन दिन चिरायू ठरो,अशा सदभावना सचिन अहिर, गोविंदराव मोहिते यांनी व्यक्त केल्या आहेत.
   
आज जगभरात  ८० पेक्षा अधिक देश जागतिक कामगारदिन साजरा करीत आहेत.१८८६मध्ये शिकागो मध्ये काही कामगारांना आपल्या न्याय हक्कासाठी प्राण गमवावे लागले.या घटनेच्या स्मृती प्रित्यर्थ १मे कामगार दिन आंतर राष्ट्रीय स्तरावर संपन्न होतो.परंतु येथील कामगारांना मात्रआपल्याअस्तित्वासाठी मोटारसायकलची रॅली काढावी लागते आहे,असा केंद्र सरकारचा खरपूस समाचार घेऊन म्हटले आहे, सरकारने ४४ कामगार कायद्याचे ४ कायद्यात रुपांतर केले आहे.हे केवळ परदेशी गुंतवणुकदा रांना आकर्षित करण्यासाठी!परंतु कामगारांच्या खच्चीकरणा विरूद्ध कामगार संघटना शेवट पर्यंत लढत रहातील,असा निर्धार कामगार दिनाच्या औचित्याने व्यक्त करण्यात आला आहे.
  
मोटार सायकल रॅलीची माहिती देताना म्हटले आहे, रविवारी पहाटे पूणे येथून कामगार मोटारसायकलने चेंबूरनाका येथून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमतील. तेथे अन्य ठिकाणावरून आलेले एकत्रित कामगार माटारसायकल रॅलीने मुंबईत राजभवनकडे कूच करतील.मुंबईला राष्ट्रीय मिल मजदूर संघ येथून गिरणी कामगारांसह अन्य उद्योगातील कामगार मोटारसायकलने चेंबूरनाका येथे जमतील.याला सर्वश्री निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, सुनिल बोरकर यांचे  आयोजन लाभले आहे.महाराष्ट्र इंटक, आयटक,सिटू, भारतीय कामगार सेना,बॅंक कर्मचारी आदी कामगार संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. चलो राजभवन मोटारसायकल रॅली आंदोलन "न भूतो न भविष्यती"ठरेल असा विश्वास शेवटी कामगार नेते,माजी राज्यमंत्री सचिन अहिर यांनी व्यक्त केला आहे.
close