shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे दूरदृष्टि विचारसारणीचे नेतृत्व - अभिजित रणवरे-पाटील.

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे हे दूरदृष्टि विचारसारणीचे  नेतृत्व -  अभिजित रणवरे-पाटील. 

निमसाखर गावातील  कोल्हापूरी बंधारा बांधण्यासाठी ३६ लाख ६० हजार रुपयांचा  निधी मंजूर करून दिल्याबद्दल राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार.
इंदापूर प्रतिनिधी: राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जलसंधारणाच्या कामाच्या माध्यमातून भूजलसाठा वाढवून शेतकऱ्यांच्या पिकाला पाणी कसे मिळेल आणि शेतकरी राजा आर्थिक दृष्ट्या कसा संपन्न होईल असा दूरदृष्टिकोन विचारसारणीचे  नेतृत्व असल्याचे छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे संचालक अभिजीत रणवरे पाटील यांनी निमसाखर गावातील रणजीत पवार बंगला या ठिकाणी ३६ लाख ६० हजार रुपयांचा कोल्हापूरी बंधारा बांधण्यासाठी निधी मंजूर करून दिल्याबद्दल आभार व्यक्त करताना त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली.

इंदापूर तालुक्यातील खेडोपाड्यातील ओढया नाल्यावर कोल्हापुरी बंधारे बांधून व पाझर तलावा द्वारे वाहून जाणारे पाणी अडवून भूजल साठा वाढवून शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी कसे मिळेल आणि त्या पाण्याद्वारे पिके चांगली येऊन इंदापूर तालुक्यातील शेतकरी राजा कसा आर्थिक दृष्ट्या संपन्न होईल. याचा विचार करून मृद व जलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी निमसाखर गावातील रणजीत पवार बंगला याठिकाणी ३६ लाख ६० हजार रुपयांचा ओढ्यावर कोल्हापुरी बंधारा बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून दिला त्यांच्या या दूरदृष्टी विचारसरणीचा आणि शेतकऱ्यांबद्दल असणारी तळमळ पाहून त्यांचे तमाम निमसाखर व इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने जाहीर आभार मानत असल्याची प्रतिक्रिया इंदापूर तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अभिजीत रणवरे पाटील यांनी दिली.
 तसेच ते पुढे म्हणाले की, इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून जलसंधारणाच्या कामासाठी ४९ कोटी ३ लाख ९७ हजार रुपयांचा निधी मंजूर केला. तसेच तालुक्यातील रस्ते, पाणी आणि विविध विकास कामांसाठी कोट्यावधीचा निधी इंदापूर तालुक्यासाठी खेचून आणला राज्यमंत्री भरणे यांनी तालुक्यातील जलसंधारणाची कामे करण्यासाठी हा निधी उपलब्ध केल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. गावोगावच्या ओड्या नाल्यावर बंधारे झाल्यास वाहून जाणारे पावसाचे पाणी अडवून ठेवता येणार आहे. त्यामुळे भूजल साठा वाढून शेतीला त्या पाण्याचा उपयोग होणार आहे. असा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करणाऱ्या या नेतृत्वाचे शेतकरी  निमसाखरचे सरपंच धैर्यशील रणवरे, नंदकुमार रणवरे, वीरसिंग रणसिंग, गोरख शेळके, दीपक लवटे, शेखर पानसरे ,भगवान रणसिंग, गणेश धनवडे, भारत धनवडे ,राजू बगे, संतोष रणमोडे, सचिन रणवरे, रामभाऊ रणसिंग, विश्वनाथ हस्पे  व निमसाखर ग्रामस्थांच्या वतीने जाहीर आभार.
close