पिंपरी खुर्द चे युवा नेतृत्व राजेंद्र पवार यांची इंदापूर तालुका भाजपा युवा मोर्चा संघटक सरचिटणीस पदी निवड.
इंदापूर प्रतिनिधी:इंदापूर तालुका भारतीय जनता पार्टी युवक मोर्चा संघटक सरचिटणीस पदी राजेंद्र कुबेर पवार पिंपरी खुर्द यांची नियुक्ती करण्यात आली. निवडीचे पत्र माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते देण्यात आले.
यावेळी हर्षवर्धन पाटील म्हणाले की,भारतीय जनता पार्टी वर असणारी निष्ठा व प्रामाणिकपणा पाहून आपली या पदासाठी निवड करण्यात आली आहे. यापुढे आपण पक्षवाढीसाठी सक्रिय रहावे. पक्षाच्या कामात नेहमी आपला मोठा सहभाग नोंदवावा पक्षाच्या लहान-मोठया बैठका, मेळावे, परिसवाद जाहीर सभा यासाठी आपली उपस्थिती आवश्यक राहील. पक्षाने आपल्यावर दिलेल्या जबाबदारीची जाणीव ठेवून आपण पक्षाच्या वाढीसाठी अत्यंत प्रामाणिकपणे निष्ठेने काम करावे. पक्षाची काम करण्याची कार्यपद्धती पारदर्शीपणाने अवलंबनावी पक्षाचे काम सर्वांना बरोबर घेऊन, सर्वांचा विश्वास संपादन करून काम करावे.

