shirdiexpress.com-Breaking | Latest Marathi News com/
Bouncing ball
-->

About Me

सूत्रकृमींचे व्यवस्थापन जैविक पद्धतीने केल्यास पिकांच्या उत्पादनात वाढ शक्‍य- डॉ. सी. एस. पाटील..!!

शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे. 
 सोमवार दिनांक २० जून २०२२

सूत्रकृमींचे व्यवस्थापन जैविक पद्धतीने केल्यास पिकांच्या उत्पादनात वाढ शक्‍य- डॉ. सी. एस. पाटील..!!

 राहुरी विद्यापीठ, : सुत्रकृमीमुळे पिकांचे 21 टक्‍क्‍यांपर्यंत नुकसान होते. अशा या घातक सुत्रकृमीचे व्यवस्थापन जैविक पद्धतीने करता येते. त्यामध्ये फुले ट्रायकोडर्मा प्लस, पॅसिलोमायसिस लिलॅसिनस, निंबोळी पेंड इत्यादीचा वापर करून सुत्रकृमीचे उत्कृष्ट असे व्यवस्थापन करणे सहज शक्य आहे. झेंडूचे आंतरपीक घेऊनही सुत्रकृमीचे व्यवस्थापन करता येते. अशा पद्धतीने जैविक पद्धतींचा वापर करून सुत्रकृमीचे व्यवस्थापन केले तर निश्चितच पिकांच्या उत्पादनात वाढ होईल असे प्रतिपादन कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सी. एस. पाटील यांनी केले.
       भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली व अखिल भारतीय समन्वित सूत्रकृमी संशोधन योजना, कृषी कीटकशास्त्र विभाग, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचाविण्यासाठी आदिवासी उप-योजना( TSP) कार्यक्रमांतर्गत आदिवासी शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठा व दैनंदिन वापरासाठी अवजारांचे वाटप कार्यक्रम अकोले तालुक्यातील शिळवंडी या गावात आयोजित करण्यात आला होता.
 
यावेळी डॉ. सी. एस. पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन करताना बोलत होते. याप्रसंगी सरपंच श्री. चहादु शिवराम साबळे, उपसरपंच सौ. नंदा साबळे, कीटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ. एस.टी. आघाव उपस्थित होते. 
      यावेळी 86 शेतकरी बांधवांना कृषी निविष्ठा व दैनंदिन वापरासाठी अवजारांचे वाटप डॉ. सी. एस. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यामध्ये बॅटरीवर चालणारे फवारणी पंप, वैभव विळा, कृषिदर्शनी आणि ट्रायकोडर्मा प्लस प्रत्येकी एक किलो याप्रमाणे साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी उपस्थितांना सुत्रकृमीसाठी मातीचे नमुने घेण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. याप्रसंगी सरपंच श्री. साबळे यांनी कार्यक्रम राबविल्याबद्दल व उत्कृष्ट कृषी निविष्ठा उपलब्ध करून दिल्याबद्दल महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे आभार व्यक्त केले. मिळालेल्या वस्तूंचा योग्य तो वापर करून पिकांच्या उत्पादनात वाढ करु असे मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. पल्लवी पाळंदे यांनी तर आभार उत्तम साबळे यांनी मानले. कार्यक्रमाला कीटकशास्त्र विभागाचे अधिकारी व कृषी सहाय्यक सौ. कडलग, गावातील पोलीस पाटील, कृषिमित्र तंटामुक्ती अध्यक्ष, ज्येष्ठ नागरिक तसेच शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

close