शिर्डी एक्स्प्रेस लाईव्ह वृत्तसेवा अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी- दिपक हरिश्चंद्रे.
बुधवार दिनांक २१ जून २०२२
रस्ता ओलांडणार्या बिबट्याला वाहनाची धडक, सुदैवाने बचावला..!!
संगमनेर : रस्ता ओलांडत असतांना एका बिबट्याला वाहनाची धडक झाल्याची घटना काल दुपारी 3.30 वाजेच्या सुमारास पुणे-नाशिक महामार्गावरील चंदनापुरी घाटात आनंदवाडी शिवारात घडली. सुदैवाने बिबट्याचा जीव वाचला असला तरी तो गंभीररित्या जखमी झाला आहे. वन विभाग त्याचा शोध घेत आहे.
पुणे-नाशिक महामार्गावर आनंदवाडी शिवारात पुण्याहून नाशिकच्या दिशेने जाणार्या एका चारचाकी वाहनाला अचानक बिबट्या आडवा आला. वाहनाची बिबट्याला धडक झाली. या धडकेत बिबट्या गंभीर जखमी झाला. काहीकाळ तो वाहनाच्या खालच्या बाजूला अडकला होता. वाहनचालकाने वाहन पाठीमागे घेताच बिबट्याची सुटका झाली आणि बिबट्याने तामकड्याच्या दिशेने धूम ठोकली. ही घटना रस्त्याने जाणार्या वाहनचालकांनी प्रत्यक्षदर्शी पाहिली, तर काहींनी त्याचे व्हिडीओ काढले.
Shirdi Express Live🎥#करीता बातम्या📰🗞️ आणि जाहिराती 🖼️साठी संपर्क @दिपक हरिश्चंद्रे (अहमदनगर जिल्हा प्रतिनिधी )📲7350591600

