प्रतिनिधी : आसावरी वायकर
नगर : २९ / ऑक्टोबर २०२१ सत्राच्या झालेल्या परिक्षेमध्ये एम बी ए विभागाचा निकाल नुकताच जाहीर झाला. चास येथील आडसूळ टेक्निकल कॅम्पस मधील एम बी ए विभागाचा निकाल कौतुकास्पद लागला.
प्रथम वर्ष (पहिले सत्र) मध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय यात अमोल काशिनाथ नरवाडे (एस.जी.पी.ए. ९.४), राहुल त्रिंबकराव घोडके (एस.जी.पी.ए.९.३), अनिकेत भागचंद्र करपे (एस.जी.पी.ए.९.३) क्रमांकाने पटकविला तसेच द्वितीय वर्ष (तिसरे सत्र) मध्ये अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय यात खानापुरे लक्ष्मीकांत राजेन्द (एस.जी.पी.ए.९.४), बाविस्कर अभिषेक किशोर (एस.जी.पी.ए.९.३), चव्हाण अमोल रामचंद्र (एस.जी.पी.ए.९.३) क्रमांकाने पटकविला.
गुणवंत विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष मा.प्रा. अनिरुध्दजी आडसूळ, उपाध्यक्ष मा.विश्वनाथजी आडसूळ, सचिव मा.सौ. लीना आडसूळ, प्राचार्य प्रा. किशोर जाधव, एम बी ए विभाग प्रमुख प्रा. सुहास पाखरे यांनी अभिनंदन तसेच कौतुक केले.
आडसूळ शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक विकासाबरोबर सर्वांगीण विकासावर भर दिला जातो. तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उज्वल नोकरीची संधी उपलब्ध करून दिली जाते असे संस्थेचे अध्यक्ष मा.प्रा. अनिरुध्दजी आडसूळ म्हणाले.
या यशामागे एम बी ए विभागातील प्रा. रमेश काकडे, डॉ. व्ही व्ही कांबळे, प्रा. पी बी. गवळी, प्रा.जी आर नाईक, डॉ.डी.पी. जैन, प्रा.ए.व्ही अहिवळे व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले असे उपाध्यक्ष मा. विश्वनाथजी आडसूळ म्हणाले.

